|Sunday, December 15, 2019
You are here: Home » भविष्य » वृषभ

वृषभ 

कोणतेही काम शंभर टक्के पूर्ण करावे ते वृषभ क्यक्ंितनीच, कितीही कष्ट पडले तरीही वज्ा्रनिर्धाराने अत्यंत अवघड काम या राशीची माणसे करू शकतात. निसर्गचक्रातील धनस्थानी या राशीचे विशेष प्रभुत्व असते. रोखीचे व्यवहार असणाऱया ठिकाणी ही रास हमखास आढळते. औदुंबर, जांभूळ व खैर या वृक्षावर या राशीची मालकी आहे. अग्नि, ब्रह्म, चंद्र, लक्ष्मी यांची विशेष कृपादृष्टी. सर्व तऱहेचे व्यापार या राशीच्या व्यक्ती यशस्वी करू शकतात. नि:ष्कपटी स्वभाव, उंच व स्थूल शरीर, तरतरीत व हसरा चेहरा, शत्रूवर कायम विजय मिळविणे, पै पै गोळा करून कोटय़वधीची माया जमविणे हे या राशीचे वैशिष्टय़. संसाराची आसक्ती, टापटीपीची व शांततेची आवड, अधिकाराची आस असणारी ही रास आहे. परंतु चिडल्यास समोरच्याला दरदरून घाम फुटेल. खोटेपणा या राशीला खपत नाही. स्पष्टवक्तेपणा अंगी असल्याने यांच्याविषयी गैरसमज अधिक होतात.

गौरवशाली व्यक्तिमत्व……..

रविंद्रनाथ टागोर

सचिन तेंडुलकर

माधुरी दीक्षित

कार्यक्षमतेचा उत्कृष्ट नमुना, जिद्द, अतिस्पष्टवक्तेपणा, देखणेपणा, मानभावीवृत्ती या साऱयांचा समुच्चय असणारी ही रास आहे. सोपविलेले कोणतेही काम निश्चयाने पूर्ण करणे, हा या राशीचा गुण असतो. मनात आल्यास हे लोक कोणतेही अवघड काम यशस्वी करून दाखवितात. पण मूड नसेल तर काडीही हलविणार नाहीत. कृत्तिका नक्षत्राचा राग व रेखीवपणा, रोहिणी नक्षत्राचे सौंदर्य व विचारवंत व्यक्तिमत्त्व, नशिबाची साथ तसेच एकाच वेळी दोन कामे करण्याची मृग नक्षत्राची क्षमता असलेली ही रास आहे. सर्पयोनीचा या राशीवर विशेष परिणाम असतो. त्यामुळे सापाचा राग आणि सळसळता उत्साह हे या राशीचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.या राशीच्या लोकांनी चुकूनही बळी, करणी यांच्यामागे लागू नये, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम होतील. राशीस्वामी शुक्राचा जेवढा मान ठेवाल, त्या प्रमाणात तुमची भरभराट होत जाईल. यावषी  हर्षल जूनपर्यंत अनिष्ट स्थानी येईल. 7 वर्षे  तेथे त्याचे वास्तव्य आहे, या कालखंडात अत्यंत नाटय़मय घटना घडतील. कोणत्याही प्रकरणात अडकणार नाही, याची काळजी घ्या. स्फोटक पदार्थांपासून दूर रहावे. कोणाच्याही मनात शत्रुत्व  निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. शनि आठव्यास्थानी येत असून तो काही बाबतीत अडचणी निर्माण करेल. सर्व तऱहेच्या अपघातापासून जपा. काहीही चूक नसताना निष्कारण आरोप येऊ शकतील. कमी दर्जाची नोकरी करण्याची पाळी येईल. परंतु जर निर्व्यसनी असाल, वर्तन स्वच्छ असेल तर हाच शनि तुमच्या जीवनाचे सोनेही करू शकेल. या वर्षाची संक्रांत या राशीतील सर्व नक्षत्रांना मोठे धनलाभ घडवित राहील. या धनाचा योग्य वापर केल्यास पैसा हाती टिकू शकेल.

 दर महिन्यातील पंचमी, दशमी, पौर्णिमा त्रासदायक ठरण्याची शक्मयता असते. त्या उलट शनिवार घातवार असला तरी मोठमोठी कामे त्याच दिवशी होत असलेली दिसून येतात. यावषी जानेवारीपर्यंत शनि सप्तमात आहे. त्यानंतर तो काही काळ अष्टमात जाईल. मन:स्वास्थ्य जरा बिघडण्याची शक्मयता आहे. संततीच्या बाबतीत काळजी घ्यावी. शत्रंtच्या उघड कारवाया दिसून येतील. लोखंड, चामडे, यंत्रे, मशिनरी यांच्याशी संबंध असेल तर मोठे लाभ होतील. वारसा हक्काने धनदौलत इस्टेट मिळण्याची शक्मयता. अहंकार व प्रेमप्रकरण यापासून दूर रहा. अन्यथा संतती व धनदौलत यावर त्याचा अनिष्ट परिणाम दिसून येईल. या शनिच्या कालखंडात भागीदारी व्यवसाय चुकूनही करू नका. तसेच नातलगापासून काही गोष्टी गुप्त ठेवा. यावषी गुरु अत्यंत शुभ आहे. शिक्षणात उत्तम यश मिळेल. कोणतेही अवघड काम सहजरित्या पार पाडाल. सरकारी नोकरी असेल तर उच्चपद प्राप्त होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. संसारिक जीवन सुखी व आनंदमयी राहील. पण हा गुरु म्हणावा तितका बलवान नाही. त्यामुळे काही बाबतीत त्याचा अनिष्ट परिणामही दिसून येईल. या गुरुमुळे मानसन्मान व प्रतिष्ठा मिळेल. लक्ष्मीवंत व्हाल. विवाहाचे योग येतील. श्रीमंत घराण्याशी विवाह संबंध जुळतील. नोकरी वा तत्सम कारणामुळे परदेश प्रवास योग येतील.

प्रजापती हर्षल लाभात आहे. मित्रमंडळी, मोठमोठय़ा व्यक्तीच्या ओळखी होतील. जेथे अपेक्षा नाही तेथूनही मोठे लाभ घडवील. या ग्रहाचा कालखंड मोठा असतो. त्याचे शुभाशुभ परिणाम केव्हाही व अचानक होण्याची शक्मयता असते. वरुणचे भ्रमण वर्षभर महत्त्वाच्या दशमस्थानी आहे. नोकरीत फसवणूक होईल. मनात नसताना नको ती कामे करण्याची वेळ येईल. व्यसनी लोकांच्या नादी लागून घराण्याचे नाव बदनाम होऊ शकेल.

प्लुटो हा ग्रह वर्षभर आठव्या स्थानात असून नाटकी व कारस्थानी व्यक्तीपासून त्रास होईल. काही वास्तुदोषही निर्माण होतील. अपघात व दुर्घटनेच्या दृष्टीने अशुभ आहे. आर्थिक स्थिती वर्षभर चांगली राहील. प्रवास, देणीघेणी, कर्जफेड या बाबतीत अनुकूलता राहील.

चंद्रग्रहणः 10 फेब्रुवारीचे छायाकल्प चंद्रग्रहण तृतीयस्थानी येत असून ते सर्व दृष्टीने शुभ आहे. आतापर्यंत न झालेली कामे होऊ लागतील. 7 ऑगस्टचे खग्रास चंद्रग्रहण भाग्यात होत आहे. एखाद्या सरकारी प्रकरणात त्रास संभवतो, सावध रहा. अतिदूरचे प्रवास जपून करावेत.


महिनावार राशिभविष्य

जानेवारी 2017- यावषी संक्रांत तुम्हाला सर्व बाबतीत शुभ आहे. वारंवार वस्त्र प्रावरणे आणि धनलाभ होत राहतील. धार्मिक व मंगल कार्यानिमित्त दूरवरचे प्रवास घडतील. दीर्घकाळ रखडलेल्या कामांना गती मिळेल. योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक मोठे लाभ देऊन जाईल. आरोग्य चांगले राहील. दीर्घकाळ मनात रेंगाळलेली महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. पै पाहुण्यांच्या आगमनाने आनंदी वातावरण राहील. पण त्यांच्यामुळे खर्चही भरमसाठ वाढेल. मुलाबाळांच्या बाबतीत महत्त्वाचे धोरण आखावे लागेल. नोकरी व्यवसायाच्यादृष्टीने काही संधी आल्यास त्या टाळू नका त्याचा पुढे फायदा होईल.


फेबुवारी- घरातील काही जुन्या वस्तू व अडगळ काढा. त्यामुळे त्रासदायक वातावरणाचे, आनंदात रुपांतर होईल. संसारिक जीवनात महत्त्वाचे चांगले फेरबदल होतील. इतरांना आधार देताना अथवा त्यांच्या जबाबदाऱया पूर्ण करताना स्वत: कोठेही अडकणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक बाबतीत अपेक्षित घडामोडी घडतील. महाशिवरात्रीदरम्यान काही गंभीर प्रसंग आपोआप नष्ट होतील.


मार्च-आर्थिक व व्यावसायिक बाबतीत उत्साही वातावरण राहील. व्यापार उद्योगातील मरगळ संपून तेजी जाणवेल. महत्त्वाची कामे होऊ लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. सख्ख्या व चुलत भावंडांच्या वागण्यात अनुकूल बदल झालेले दिसतात. प्रेमप्रकरणात असाल तर त्याचे विवाहात रुपांतर करू शकता. मालमत्तेसंदर्भातील काही कटू प्रश्न सुटतील. गहाळ झालेली कागदपत्रे, किमती वस्तू, अथवा व्यक्ती पुन्हा सापडण्याची शक्मयता. दीर्घकाळ दूर गेलेली व्यक्ती भेटल्याने काही कायदेशीर अडचणीतून मार्ग निघेल.


एप्रिल-आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. गैरसमज दूर झाल्याने कौटुंबिक वातावरण समाधानी राहील. स्वस्तात किमती वस्तूची खरेदी करू शकाल. नोकरीतील जटील प्रश्न असतील तर ते सुटतील. विवाह व वास्तुशांतीच्या कार्यात भाग घ्यावा लागेल. काहींच्या जीवनात चित्रपटाप्रमाणे नाटय़मय घटना घडतील. काहीही खरेदी करताना नको त्या गोष्टी खरेदी होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. सरकारी कामे या महिन्यात पूर्ण करून घ्यावीत.


मे- उद्योग व्यवसायात न पेलवणारी जबाबदारी पडल्याने ताणतणाव वाढेल. प्रवास, देणेघेणे, आहेर, मानपान, पैजा, शर्यती, संगणक व प्रेमप्रकरणे यासाठी बराच खर्च कराल. नोकरीतील बदनामी तसेच वरिष्ठांचा रोष वगैरे समस्या मिटतील. दमदाटी करणारे बॉस आपणहून दूर जातील किंवा त्यांची बदली होईल. तरुण तरुणींच्या काही समस्या असतील तर त्यांनी थोरामोठय़ांच्या सहकार्याने त्या मिटवाव्यात. पोलीस केसपासून दूर रहावे. चुकीचे अथवा नको ते संदेश वॉटसअप अथवा थट्टामस्करी करताना  गेल्याने मोठा गहजब होण्याची शक्मयता आहे.


जून-या महिन्यातील पौर्णिमेला ज्या घटना घडतील त्यांचे शुभाशुभ परिणाम आगामी सहा महिन्यापर्यंत टिकतील. सूर्याच्या अयन बदलाचा  हा परिणाम असेल. नोकरी व्यवसायातील काही जबाबदाऱया कमी होतील. कुणाच्याही सांगण्याला भुलून भ्रष्टाचार, आमिष यात गुंतू नका. अन्यथा नोकरी जाईल. गुरु शुभ असल्याने आर्थिक बाबतीत महत्त्वाची स्थित्यंतरे घडतील. कौटुंबिक जीवनातील कटू प्रसंग संपल्याने समाधानाचे वातावरण राहील. लग्नासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील.


जुलै- विवाहाच्या दृष्टीने अतिशय बलवान ग्रहयोग. मन शांत ठेवून मनाचा मोठेपणा दाखविल्यास अत्यंत भाग्यशाली विवाह संबंध जुळतील. मोठमोठय़ा योजना हाती घेऊन त्या यशस्वी कराल. बोलण्याच्या भरात कुणाचे मन अथवा भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्या. याच किरकोळ चुका नंतर महागात पडू शकतात.


ऑगस्ट- पूर्वी  कधीतरी उसनवार दिलेली व विस्मरणात गेलेली जुनी थकबाकी वसूल होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. ऐच्छिक संतती होण्याची शक्मयता. वास्तुच्या दृष्टीने चांगले योग दिसतात. आर्थिक अडचणी अथवा परमिशन वगैरेमुळे बांधकाम अडलेले असेल तर ते सुरू होईल. शासकीय कामातील अडचणी दूर होतील. अतिवेगाने वाहन चालविणे जिवावर येईल. त्यासाठी जपावे लागेल. कोठेही मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्यावी लागेल. धबधबे, दऱयाखोऱया, डोंगर, नद्या वगैरे ठिकाणी वावरताना सेल्फीच्या मागे लागू नका.


सप्टेंबर-काही जुन्या आठवणी अथवा कागदपत्रे अथवा फोटोमुळे उल्लेखनीय घटना घडतील. नोकरी व्यवसायात आनंदी वातावरण राहील. दीर्घकाळ रखडलेले बदली, बढतीचे काम विनासायास होईल. कुणावरही न विसंबता जे काम कराल त्यात चांगले यश मिळेल. काही बाबतीत कठोर निर्णय घेणे आवश्यक ठरेल. दैनंदिन कार्यक्षेत्रात अचानक बदल होण्याची शक्मयता आहे. संततीबाबतची आशा पूर्ण होईल.


ऑक्टोबर-मित्रमंडळी अथवा जवळच्या व्यक्तीकडून अवसानघात होईल. आपले कोण परके कोण हे ओळखून वागणे आवश्यक. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱयाला जाण्याची शक्मयता. त्यासाठी मनावर संयम ठेवून वागणे योग्य. अनैतिक कृत्यात गुंतलेल्या व्यक्तींमुळे गोत्यात याल. कोर्टकामात अडथळे येतील. काहीजण घातपात करण्याची शक्मयता. आर्थिक व्यवहार जपून करावेत. कुणावरही विसंबून न राहता स्वत:ची कामे स्वत:च  करा उत्तम यश मिळेल.


 नोव्हेंबर- या महिन्यात पंचमातील मंगळामुळे शिक्षणात अडथळे येतील. पण खेळात प्राविण्य मिळवाल. रवि, गुरु, शुक्र आर्थिक बाबतीत उत्तम फळ देतील. सप्तमातील बुध विवाहाच्या बाबतीत अनुकूल आहे. कोर्टकचेऱयांची प्रकरणे मात्र चुकूनही करू नका. 18 तारखेची अमावस्या वैवाहिक बाबतीत काहीतरी गडबड, गोंधळ करण्याची शक्मयता आहे. त्यादिवशी शक्मयतो मौन पाळा. 26 नोव्हेंबरला शुक्राच्या आगमनाने कुटुंबात सौख्यकारक घटना घडतील. कालसर्प योगाचे ग्रहमान चालू असल्याने मानसिक समाधान कमी राहील. यातील शनिचे भ्रमण महत्त्वाच्या कामात खोळंबा करेल.


डिसेंबर- 3 तारखेची पौर्णिमा तुमच्या राशीत होत असून मनातील अनेक गोष्टी साध्य होतील. 11 तारखेनंतर वक्री बुधाचा परिणाम भागीदारी व्यवसायावर होईल. 15 तारखेनंतर रवि, शनि युती होत असल्याने किरकोळ अपघात, खरचटणे, दंगली यापासून धोका दर्शवित आहे. काळजी घ्या.

18 ची अमावस्या आर्थिक व्यवहारात गडबड करेल. 20 तारखेनंतर शुक्राचे अष्टमातील आगमन काही संकटाची तीव्रता सौम्य करेल. तरीदेखील या महिन्यात आपण कोणतेही काम सावधगिरीने करणे योग्य ठरेल. मंगळ, गुरुचे ष÷ातील भ्रमण शत्रुत्वाचे रुपांतर मित्रत्वात करेल. अधिकारपदाचे योग आहेत. शेती, बागायती संबंधीत क्यवहार फायदेशीर ठरतील. उष्णता विकारापासून जपावे लागेल. या महिन्यातील उत्तरायणाशी  संबंधित 20, 21, 22 या तारखांकडे विशेष लक्ष द्यावे. काही विशेष घटना घडतील.

Related posts: