|Friday, December 6, 2019
You are here: Home » भविष्य » मिथुन

मिथुन 

कालपुरुषाच्या कुंडलीतील पराक्रमस्थानी असणारी ही रास. राश्याधिपती बुधावर श्री विष्णूची मालकी आहे. लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदत नाहीत, ही म्हण ही रास खोटी करते. बुद्धी असेल तरच लक्ष्मी येईल हा या राशीचा सिद्धांत आहे. मेषेची चंचलवृत्ती व वृषभेची स्थिरता, नियोजन व आयोजन या गोष्टींचे मिश्रण या राशीत दिसून येते. संपूर्ण जगाला शहाणे करून सोडणारी रास. कितीही हुशारी असली तरीही कोणी तरी गॉडफादर यांच्यामागे असावा लागतो. यावषी शनि, हर्षल, गुरु या तीन ग्रहांचे प्राबल्य परिणाम करेल.

ज्या ज्या ठिकाणी बुद्धिचा संबंध आहे त्या त्या ठिकाणी मिथुन राशीच्या व्यक्ति विशेष प्रकर्षाने दिसून येतात. बुद्धिवंतांची इंगिते ओळखण्याची उपजतच शक्ति यांच्याकडे असते. एखाद्याला मोठी इस्टेट मिळाली पण ती कशी टिकवायची अथवा त्यात कशी भर घालायची याचे ज्ञान नसेल तर ती इस्टेट सहज हातची निघून जाईल. कान, चेहरा, वाणी, बुद्धिमत्ता नातेवाईकांशी चांगले वाईट संबंध, विष्णूची कृपा, राहुचा राजकारणी मुत्सद्दीपणा, घराण्यातील काही शापित दोष, भूतप्रेत बाधा, एकाचवेळी दोन डगरीवर हात ठेवण्याची वृत्ती तसेच एखाद्याचे पुनर्वसन करून त्याला सर्वोच्च पदावर पोहचविण्याची हीच रास आहे. बुध, राहू, गुरु आणि मंगळ या सर्व बलाढय़ ग्रहांचे पाठबळ असणारी ही रास आहे. त्यामुळे  जो काही निर्णय असेल तो ठाम असेल. एखाद्याची रास कोणतीही असो पण त्याच्या लग्न कुंडलीत जर मिथुन रास बिघडली तर अनेक मोठमोठी संकटे येतात व त्याला बौद्धिक तऱहेनेच मार्गदर्शन घेऊन सुटका करून घेता येते व ही रास शुभ अवस्थेत असेल तर कुबेराचे ऐश्वर्यही मिळवून देईल. सर्व गुण चांगले असले तरीदेखील आणि कितीही  कष्ट केले तरी मिथुन राशीच्या लोकांना उच्चपद, सत्तेचे नेतृत्व अथवा मोठे अधिकार लवकर मिळत नाहीत. मोठ मोठे मंत्री, आमदार, खासदार, सल्लागार बहुतेक या राशीचे असतात, असे दिसून आलेले आहे. मुळातच भावनाशील  असलेल्या या राशीवर आजूबाजूच्या वातावरणाचा त्वरित परिणाम होतो. त्यासाठी प्राप्त परिस्थितीशी विचारपूर्वक तोंड देणे आवश्यक ठरते.

यावषी जानेवारी 9 पर्यंत शनिचे पाठबळ चांगले आहे. करणी, जादूटोणा वगैरेंचा काही परिणाम होणार नाही. आर्थिक स्थिती उत्तम  राहील. त्यानंतर  काही काळ शनिचे भ्रमण सप्तमात राहील. शासकीय कामात उत्तम यश मिळेल. राजकारणात गेल्यास गडगंज पैसा कमवाल. कोर्टप्रकरणात सरशी होईल. एखादे तयार घर अथवा  फ्लॅट घेण्याचे योग येतील. ज्या ज्या वेळी शनि-मंगळाचा शुभ योग होईल, त्या त्यावेळी मोठय़ा प्रमाणात धनलाभ होईल. दूरवरचे प्रवास घडतील.

शनिच्या दुसऱया बाजूकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. भावंडांशी कडाक्मयाचे मतभेद होतील. ज्ये÷ पुत्राशी मतभेद होतील. काही जणांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होईल. मामा-मावशींच्या बाबतीत त्रासदायक अनुभव. या शनिच्या कालखंडात चामडय़ाच्या वस्तू खरेदी केल्यास विनाशकारी अनुभव येतील. सर्व तऱहेच्या अपघातापासून जपा. व्यसन असेल तर लक्ष्मी पाठ फिरविल. एखाद्या तीक्ष्ण वस्तुमुळे डोक्मयाला इजा होण्याची शक्मयता. यावषी गुरु चतुर्थ स्थानात आहे. थोरामोठय़ांची संगत लाभेल. देखण्या व आकर्षक व्यक्तिशी विवाह जुळण्याची शक्मयता. लॉटरी, मटका, शेअर बाजार यातून मोठा धनलाभ. व्यापार उद्योग व्यवसायात जितके प्रामाणिक रहाल. त्या प्रमाणात चांगली प्रगती होईल. ज्या क्षेत्रात असाल त्यात उच्चपद प्राप्तीचे योग, स्वत:चे वाहन आणि घर होईल. मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी आणि नावलौकिक, चतुर्थ गुरु काही वेळा त्रासदायक योगही निर्माण करतो. एखादा खोटा आरोप येणे, आळ येणे, मानहानी, संततीच्या बाबतीत अडचणी, धर्माच्या नावाखाली वर्गणी गोळा करताना संकटात पडणे तसेच जर कोणाला उधार उसनवार दिला असाल तर ते पैसे वसुल होणे कठीण होईल. या गुरुचा कोणताही त्रास होऊ नये. यासाठी पुरोहित किंवा गुरुजींचा आशीर्वाद घ्यावा. दत्तात्रेय पूजन करावे.

7 एप्रिलला लाभस्थानी येणारा हर्षल सतत मोठे लाभ घडवत राहील. ध्यानीमनी नसता विमानप्रवास घडू शकतील. लहानपणी तुमची परिस्थिती कशीही असली तरीही एकदम उच्चपदी जाल. परंतु याच हर्षलमुळे तुमच्या जीवनात अनेक प्रेमप्रकरणे निर्माण होतील, सावध रहा. तुमचे क्षेत्र कोणतेही असो बौद्धिक व विद्युत क्षेत्रात नवनवे शोध लावाल. सात पिढय़ात कोणी कमविली नाही ती, येत्या सात वर्षात  मिळण्याचे योग. प्रयत्न चालू ठेवा. यावषीची संक्रांत तुम्हाला सर्वदृष्टीने शुभ असून सतत धनलाभ होत राहतील.

चंद्रग्रहणः 10 फेब्रुवारीचे चंद्रग्रहण धनस्थानी होत असून सर्व प्रकारच्या आर्थिक बाबींसाठी उत्तम. परंतु नको त्या जबाबदाऱया वाढतील. 7 ऑगस्टचे चंद्रग्रहण अष्टमस्थानी होत आहे, आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा, कोणतेही अति धाडस करू नका. 12 सप्टेंबरनंतर विवाहास व संततीसाठी अनुकूल. मुळातच ही रास भावनाप्रधान असल्याने  गंभीर वादावादीचे प्रसंग व मतभेद टाळा.


मासवार फलप्राप्ती

जानेवारी 2017- विवाहस्थानी होणारी शाकंभरी पौर्णिमा वैवाहिक जोडीदाराच्या  बाबतीत भाग्योदयकारक योग. भागीदारी व्यवसायावरही त्याचा चांगला प्रभाव जाणवेल. संक्रातीपर्यंतचा काळ चांगला जाईल. मृग, आर्द्रा, पुनर्वसु नक्षत्र असणाऱयांना ही संक्रांत वर्षभर मोठा धनलाभ घडवील. महिन्याच्या उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.


फेब्रुवारी- 9 तारखेचा गुरुपुष्यामृत योग आर्थिक बाबतीत शुभ फळ देईल या दिवशी कोणतेही आर्थिक काम करावे. जागेचे व्यवहार यशस्वी होतील. शुक्र, मंगळाचा योग कला -कौशल्य, चित्रपट, संगीत, गायन यात चांगले यश मिळवून देईल. या योगावर काहीवेळा प्रेमप्रकरणेही होतात. त्यासाठी काळजी घ्यावी. महाशिवरात्री अष्टमात होत आहे. आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्यासाठी महामृत्यूंजयाचा जप  करावा. अमावास्या भाग्यात होत आहे. प्रवास जपून करावेत.


मार्च- बुध, शुक्र, हर्षल दशमात आहेत. नोकरी, व्यवसाय, माता पिता तसेच धंदा रोजगाराच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे फेरबदल संभवतात. राजयोगावरील 12 ची होळी पौर्णिमा तृतीयात होत आहे. सर्व तऱहेच्या इच्छा पूर्ण करण्यास अनुकूल काळ. मंगळ लाभात आहे. चारचाकी वाहन घेण्याची ऐपत निर्माण होईल. व्यवसायात फायदा दिसेल. तुमचे वय जर 24 ते 28 वर्षे दरम्यान असेल तर मोठय़ा प्रमाणात धनलाभाची शक्मयता आहे. गुढीपाडवा दरम्यान शुभ अनुभव येतील.


एप्रिल- या आठवडय़ात लक्ष्मीयोगातील ग्रहमान आहे. कोणताही व्यवसाय सुरू करणार असाल तर योग्य काळ. शनि, गुरुचा केंद्रयोग वास्तुविषयक कामात मोठे यश देईल. पौर्णिमेदरम्यान अचानक मोठे खर्च निघतील. अमावास्या यावेळी मित्रमंडळीकडून नुकसान दर्शविते. कुणाच्याही कोणत्याही धोकादायक प्रकरणात अडकू नका. नोकरीच्या ठिकाणी नवनवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. कामाच्या ठिकाणीच ओळखीतून लग्न ठरण्याचे योग. सरकारी कामात चांगले यश मिळवाल.


मे- मंगळ तुमच्या राशीतच आहे. घाईगडबडीत कामाचा उरक पार पडेल. दशमातील शुक्र सर्व बाबतीत लाभदायक आहे. दैवी कृपेचा अनुभव येईल. अपेक्षा नसताना चांगली नोकरी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. गुरुचे पाठबळ नाही. त्यामुळे लग्न वगैरे मंगल कार्य करताना काळजी घ्यावी. फसवणूक होण्याची शक्मयता राहील. अमावास्येदरम्यान कोठेही मोठी गुंतवणूक करू नका.


जून- अनेक क्षेत्रातील मोठी माणसे भेटतील. त्यांच्या साहाय्याने तुम्हाला न जमणारी कामे करून घ्या. फक्त बोलणे गोड ठेवा. कुठेही कडवटपणा येणार नाही याची काळजी घ्यावी. रविचे भ्रमण अनुकूल नाही. त्यामुळे सरकारी क्षेत्राशी संबंध असलेले व्यवहार खोळंबतील. घशाचे विकार उद्भवतील.


जुलै- स्वगृहीचा शुक्र 12 व्या स्थानी आहे. ऐनवेळी कुणाची तरी मदत मिळून न होणारी कामे होतील. या कालखंडात वैवाहिक जोडीदाराचा सल्ला जीवनाला कलाटणी देणारा ठरेल. अनेक रखडलेल्या कामांना गती मिळेल. रवि, मंगळ, बुध धनस्थानी आहेत. वाहन, घरासाठी चांगले योग. पण जुन्या वस्तू मात्र घेऊ नका. विद्युत उपकरणे जपून वापरा. बुध राहुची युती आर्थिक लाभाच्या अनेक संधी प्राप्त करून देईल.


ऑगस्ट- 7 तारखेची कार्यसिद्धीयोगावरील पौर्णिमा आरोग्य, धनलाभ, कौटुंबिक जीवन, शेजारी व नातेसंबंध या बाबतीत शुभ फळ देणारी आहे. शुक्र तुमच्या राशीत आहे. लक्ष्मीची कृपा राहील. शनि, सर्व बाबतीत अनुकूल असल्याने शत्रूचे काही चालणार नाही. गुरु, शुक्र षडाष्टक योगावर अनैतिक मार्गाकडे मन वळण्याची शक्मयता असते. सावध  रहा. सोने, चांदी,लोखंड, गहू, साखर कारखाने यांच्याशी संबंध असेल तर अपेक्षेपेक्षा अधिक फायदा होईल.


सप्टेंबर- रवि, मंगळ, बुधाचे उत्तम सहकार्य असल्याने सर्व कामे विनाविलंब होतील. शुक्र राहुचा अशुभ योग. अनावश्यक  खर्च वाढवील. धनप्राप्तीच्या कामात अडथळे येतील. पण तरीही कोणतीही अडचण जाणवणार नाही. वृद्धीयोगावरील  अमावास्या गुरुच्या सान्निध्यात होत आहे.  वास्तुसंदर्भातील काही किचकट प्रश्न सुटतील. सांसारिक जीवनात निर्माण झालेले वादळ कमी होईल. बाधिक दोषही निर्माण करील.


ऑक्टोबर- पंचमात आलेल्या गुरुमुळे मंगलकार्याच्या दृष्टीने चांगले योग. कुलदेवतेची कृपा लाभेल. अपघात, आजार व संकटे यातून सुटका होईल. आर्थिक विवंचना कमी होतील. अनेक बाबतीत शुभ वार्ता ऐकण्यास मिळतील. घरातील वातावरण अतिशय आनंदी व समाधानी असेल. केलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. मंगळ, शुक्राचा शुभयोग आहे. अंगच्या कलागुणांना कुठेतरी योग्य न्याय मिळेल व जीवनाला शुभ कलाटणी मिळू शकेल.


नोव्हेंबर- पंचमात होणारी रवि, गुरु, शुक्र युती तुमचे श्रे÷त्व सिद्ध करेल. मानसिक, आर्थिक, सामाजिक सर्व बाबतीत यश मिळेल. उत्तम नावलौकिक होईल. आर्थिक बाबीतील अडथळे दूर होतील. 16 तारखेला बदलणारा रवी शत्रूंची दाणादाण उडवील. 18 ची अमावास्या काही बाबतीत त्रासदायक ठरण्याची शक्मयता आहे. मंगळ, गुरुचा योग एखाद्या न होणाऱया कामातही यश मिळवाल. परंतु मुलाबाळांच्या चुकांमुळे अथवा त्यांच्या कारवायांमुळे अडचणीत याल. त्यासाठी मुलांना मोबाईल, गाडी अथवा सोईसुविधा देताना विचार करा.


डिसेंबरö रवि, शुक्राचा योग बेफिकीर वृत्ती व निष्काळजीपणामुळे अडचणी निर्माण करेल. नैराश्येचे प्रसंग असतील तर त्यात भाग घेऊ नका. काहीवेळा नशीबाने सर्वकाही मिळते. परंतु कर्माने ते घालविण्याची चूक करू नका. दत्तपौर्णिमा आध्यात्मिक बाबतीत शुभ. 7 तारखेच्या गुरुपुष्यामृत योगावर आर्थिक लाभ होतील. 18 ची सोमवती अमावास्या वैवाहिक जीवनावर प्रभाव टाकण्याची शक्मयता आहे. 20 डिसेंबरला सप्तमात येणारा शुक्र विवाहासंदर्भात अडलेल्या कामात गती देईल.  भागीदारी व्यवसाय करणार असाल तर अनुकूल काळ आहे. चाकोरी सोडून कोणता तरी व्यवसाय स्वीकाराल.

2017 हे नववर्ष आपणा सर्वांना सुखसमृद्धी, आयुरारोग्य, सुविद्या, सौभाग्य, मांगल्य, ऐश्वर्य व प्रसन्नता प्राप्त करून देवो. आम्हा सर्वांकडून सर्वांना सदिच्छा, हार्दिक शुभेच्छा व अभिष्टचिंतन.

Related posts: