|Saturday, December 7, 2019
You are here: Home » भविष्य » कर्क

कर्क 

कालपुरुषाच्या पोटावर अंमल असणारी रास म्हणजे ‘कर्क’. यावषी गुरु, शनि, हर्षल तसेच दोन चंद्रग्रहणे यांचा सर्वाधिक प्रभाव या राशीवर राहील.  देवगण व राक्षसगण या दोहोंचा प्रभाव असल्याने ही रास काहीवेळा शांत तर काहीवेळा तप्त असते. त्यामुळे मानसिक संतुलन फायदेशीर. पिंपळपूजन, वेळू, नागचाफा यांचे पूजन तुम्हाला सर्व बाबतीत भाग्यकारक ठरणार आहे. राहू, केतुचे भ्रमण आर्थिक कारणावरून वादावादीचे प्रसंग निर्माण करेल. 7, 8 एप्रिलला हर्षल दशमस्थानी येईल व साधारणत: 7 वर्षे तो तेथे राहील. संपूर्ण जीवन बदलून टाकणारा हा योग आहे.

पी.व्ही सिंधु

अखिलेश यादव

हार्दीक पटेल

राशिमंडलातील ही चौथी रास. विशाल अंतःकरण, पुनर्वसु नक्षत्राची हुशारी, सांगोपांग विचार करणारी बुद्धिमत्ता, कुटील नीती हे गुण या राशीत दिसतात. आश्लेषाचा मनाला भुलविणारा तरतरीतपणा, भुजंगासारखे फुत्कारणे, सासुशी न पटणे हे सारे गुणधर्मही याच राशीत दिसतात. कुबेराचे भांडार सांभाळणारे पुष्य नक्षत्र याच राशीत आहे. प्रेमप्रकरणात गुंतून नंतर काहीच घडले नाही, असे दर्शविणारी रास. बुध, चंद्र, गुरु, शनि या चार ग्रहांचे प्राबल्य असणारी ही रास आहे. जगातील सर्व जलाशये, विहिरी, सर्वांचे नशीब याच राशीवर अवलंबून असते. ही रास बिघडली तर दुर्दैवाचे दशावतार पहायला मिळतात व रास जर चांगली असेल तर झोपडपट्टीत जन्माला आलेला माणूसही राजा, मंत्री, पंतप्रधान होऊ शकतो. नोकरीत किंवा कोठेही आपल्या मादक बोलण्याने जगाला आकर्षून कसे घ्यावे, हे या राशीकडून शिकावे. कोणत्याही बाबतीत ठोस निर्णंय या व्यक्ती घेऊ शकत नाहीत. शत्रूची पाठ घेण्यास ऐकत नाहीत, आप्तेष्ट मंडळांकडून सतत त्रास भोगणारी माणसेही याच राशीत जास्त दिसून येतात. परदेशी गेल्यास स्वत:च्या कुटुंबाचे व देशाचे नाव हे लोक उज्ज्वल करतील. पित्तप्रकोप  व जलोदर या रोगांचा या राशीवर विशेष प्रभाव पडतो. जेवताना- खाताना ठसका लागणे, उचक्मयांचा प्रभाव, रक्ताची स्थिती, समुद्राची भरती-ओहोटी, मानसिक संवेदना,  टापटीप, मानभावीपणा या सर्वांवर या राशीची मालकी आहे. साध्या झोपडीत असो वा राजमहालात, कोठेही आनंदाने राहण्याचा स्वभाव. गरिबांविषयी व मुक्मया प्राण्यांविषयी कणव, खोल विहीर, माणसाचे मन, पुनर्वसू नक्षत्राची जीर्णोद्धार करण्याची वृत्ती, जगाचे कल्याण करण्याचा सतत विचार करणारी, सर्व देवांच्या संपत्तीच्या खजिनदाराची कृपा, घराण्यातील पूर्वजाने केलेल्या पापपुण्याचा हिशोब करून त्याचा जीवनावर प्रभाव पाडणारी तसेच, नाटकी आवेशात बोलण्याची खुबी असणारी रास हीच. घरात 10, 15 लोक असतील, सर्वांच्या कुंडल्यातील ग्रहमान बिघडले असेल पण त्या कुटुंबात जर पुष्य नक्षत्राची व्यक्ती नसेल तर ते कुटुंब मोठय़ात मोठय़ा संकटातून तावून सुलाखून निघेल. या राशीचे हे गुणधर्म पाहाता राशीचा मोठेपणा सहज समजून येईल. ही रास अत्यंत भोळय़ा स्वभावाची असल्याने प्रेमप्रकरणात या राशीच्या व्यक्ती फार लवकर फसतात व नंतर पश्चाताप करीत बसतात. त्यामुळे या राशीतील काही नक्षत्रांच्या मुलांमुलींवर फार लक्ष ठेवावे लागते. स्वच्छ मनाची माणसे असल्याने या लोकांना खोटेपणा खपत नाही. त्यामुळे या व्यक्तीचे सासवांशी फारसे पटत नाही. सर्वांचे कल्याण करणारी ही रास आहे. एखादा व्यवसाय चालत नसेल तर या राशीतील एका दैवी नक्षत्राच्या व्यक्तींना कामावर ठेवल्यास उद्योग व्यवसाय जोरात चालू शकतो. बऱया वाईट परिस्थितीचा त्वरित परिणाम होतो. शनिपीडेचा त्रास या राशीलाच अधिक होतो. शनिची ही नावडती रास आहे. पण याच राशीतील पुष्य नक्षत्राची मालकी शनिकडे आहे. राशिस्वामी चंद्र हा मनाचा कारक असल्याने प्रत्येक राशीच्या लोकांवर या राशीचा कमी जास्त प्रमाणात प्रभाव पडतोच. एखाद्याला काही बाधा असतील तर ते कर्पेमुळे बरोबर समजू शकते. या व्यक्तीने समोरच्या क्यक्तीला बाधा असल्याचे सांगितल्यास ते खरे ठरते पण त्याच क्षणी ती बाधा कर्क व्यक्तीच्या शरीरात शिरते. यासाठी कर्केच्या क्यक्तीनी बाधित व्यक्ती व पछाडलेल्या व्यक्तीपासून कायम दूर रहावे.

 राजकारणात जाण्याचा योग, उच्चपदाची संधी, कल्पकता व धैर्य यांच्या जोरावर कोणतेही कार्य सिद्धीस न्याल. व्यवसाय, नावलौकिक तसेच उपजीविका याबाबत विलक्षण अनुभव येतील. ज्या क्षेत्रात असाल, त्यात तुमचा ठसा उमटेल. त्यातही जर संगणक, इलेक्ट्रॉनिक, मोबाईल, हवाई क्षेत्र यांच्याशी संबंध असेल तर प्रगतीचे उत्तुंग शिखर गाठाल. या स्थानी हर्षल अचानक महत्त्वाच्या घडामोडी, बदल घडवितो. ध्यानीमनी नसता लक्षाधीश, कोटय़धीश होणे, उच्चपदावर जाणे तसेच काही आकस्मिक घटना घडून रसातळाला जाणे, असेही अनुभव येतील. अंधश्रद्धेला वाव न देता जर विज्ञाननि÷ राहिलात तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी माराल. स्वत:चे घरदार, वास्तु, वाहन या दृष्टीने हे वर्ष उत्तम ठरेल. विवाहाच्या दृष्टीने मात्र उत्तम योग. शनिचे पाठबळ उत्तम मिळाल्यामुळे कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही. तुमच्यामुळे यावषी अनेकांचे कल्याण होईल. या वर्षाची संक्रांत पुनर्वसु नक्षत्राला जरा लाभदायक आहे. पण पुष्य व आश्लेषा नक्षत्राला वर्षभर प्रवास होत राहतील.

ग्रहणः 10 फेब्रुवारीचे चंद्रग्रहण तुमच्या राशीतच होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. नारळी पौर्णिमेला होणारे 7 ऑगस्टचे चंद्रग्रहण वैवाहिक जीवनावर प्रभाव टाकेल. कोणत्याही बाबतीत गैरसमज होणार नाहीत. याची काळजी घ्या.


मासवार फल

जानेवारी 2017-एकमेकांच्या गैरसमजुतीमुळे वैवाहिक जीवनात कलह  निर्माण होईल. गॅस, विजेची उपकरणे हाताळताना काळजी घ्या. गुप्तशत्रूच्या कारवाया सुरू होतील. नोकरी व्यवसायात असाल तर एकाग्रतेने लक्ष द्या, अन्यथा आर्थिक हानी जाणवेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. या महिन्यात कोणताही व्यवहार करताना, सही करताना विचारपूर्वक बघूनच करा. उष्णतेचे विकार जाणवतील. मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा.


फेब्रुवारी- या महिन्यात मंगळ, शुक्र प्रभावी असल्याने चैनीसाठी बराच खर्च होईल. प्रवास घडतील. जुगारी प्रवृत्तीपासून दूर रहा. या महिन्यात निळे व काळे कपडे चुकूनही घालू नका. कुटुंबात काही धार्मिक कार्ये होण्याची शक्मयता आहे. काहीवेळा रात्री वादळ यावे व रस्ता चुकावा अशी परिस्थिती निर्माण होईल. रक्तदोष, ऍनिमिया यांची शक्मयता. 9 तारखेचा गुरुपुष्यामृत योग भाग्योदयकारक आहे. महाशिवरात्री सप्तमस्थानी होत आहे. वैवाहिक समस्या असतील तर महादेवाला रुद्राभिषेक करून घ्या.


मार्च- नोकरी उद्योग, व्यवसाय व मुलाबाळांच्या भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग. जे काम हाती घ्याल ते यशस्वी कराल. शत्रुनाशक ग्रहमान  आहे. नोकरीत असाल तर अनपेक्षित बदलीला सामोरे जावे लागेल. तुमचा कुणीतरी गैरफायदा घेण्याची शक्मयता असल्याने कुणालाही शब्द देताना काळजी घ्यावी. धनलाभाच्या संधी येतील. पण त्यात नको त्या अटीच फार असतील.


एप्रिल-नोकरी, विवाह, मुंज व दैवी कार्यासाठी प्रवास घडतील. देवधर्माच्या कृत्यात चांगले यश. घरात जर शिस्त व इतर बाबी व्यवस्थित असतील तर  निश्चितच या महिन्यात शुभ व लाभदायक घटना घडतील, वास्तू, लग्न व सरकारी कामात मोठे यश देणारा महिना. काही जणांकडे अडकलेली कागदपत्रे अचानक परत मिळण्याची शक्मयता.


मे- या महिन्यात जीवनाला चांगले वळण मिळण्याची शक्मयता आहे. आतापर्यंत खोळंबलेली अनेक कामे गतिमान होतील. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलाल. घरगुती समस्या निवारल्या जातील. नवीन वस्तुंची खरेदी होईल. एखाद्या ओळखीचे रुपांतर विवाहात होईल. शिक्षणात मात्र म्हणावे तसे यश मिळणार नाही. कोर्टप्रकरणे असतील तर यश मिळेल.


जून-अनेक किचकट प्रश्न सुटतील. धनलाभाच्या दृष्टीने अनुकूलता लाभेल. संततीच्या दृष्टीने चांगले फळ मिळेल. दक्षिणायनारंभाच्या आसपासचे तीन दिवस सर्व बाबतीत जपावे. गुरु अनुकूल नसल्याने जे काही कराल ते स्वत:च्या हिमतीवरच करावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन आनंदी वातावरण निर्माण करेल.


जुलै-कुणालाही मदत करताना सावध रहा. काही माणसे उलटण्याची शक्मयता. नको ते आरोप येतील. त्यासाठी आपल्या घराण्याशी संबंधित खासगी बाबींचा कुणाकडेही चुकूनही उल्लेख करू नका. भाउबंदकी असेल तर ती मिटविण्याचा प्रयत्न करा. कोर्ट प्रकरणापासून चार हात दूर रहा. अमावास्येदरम्यान घरातील सर्व अडगळ बाहेर काढा. आश्चर्यकारक चांगले अनुभव येतील, तसेच खोळंबलेली कामेही होऊ लागतील.


ऑगस्ट-कमी कष्टात अचानक धनलाभ, संततीचा उत्कर्ष, प्रवासात लाभ. नवनव्या कार्यक्षेत्रात प्रवेशाच्या दृष्टीने चांगले योग आहेत. धनस्थानी येणारा रवि आर्थिक बाबतीत नवनव्या संधी आणील. पण डोळय़ांची काळजी घ्या. अती मंद व अति प्रखर प्रकाश यापासून जपणे आवश्यक. काही नवे करार मदार कंत्राटी कामे या महिन्यात यशस्वी होतील.


सप्टेंबर- हा महिना मध्यम स्वरुपाचे फळ दर्शविणारा आहे. काही योजना व कामाचे स्वरुप बदलावे लागेल. कामाच्यासंदर्भात गुप्तगोष्टीचा कुणाला सुगावा लागू देऊ नका. उंचावरून पडणे, वाहन अपघात, दुर्घटना घडण्याची शक्मयता. काळजी घ्यावी. आरोग्य जपा. या महिन्यात इतरांची महत्त्वाची कामे जरा जपून करावीत.


ऑक्टोबर-दिवाळी आनंदाची जाईल. मनातील अनेक महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. लक्ष्मीप्राप्तीच्या दृष्टीने चांगले योग आहेत. गुरु चतुर्थात आल्यामुळे कौटुंबिक समस्या कमी होतील. घरदार, वास्तू, वाहन खरेदीचे योग. जर पूर्वेला असाल तर बांधकामास सुरुवात होईल. मोठय़ा व्यवसायात भाग घेण्याची ऑफर येईल.


नोव्हेंबर- या महिन्यात तृतीयस्थ मंगळामुळे, कोणतेही काम उत्साहाने पूर्ण कराल. परंतु भावंडांशी वाद होईल. रवि, शुक्र, गुरु चतुर्थात असल्याने नको ती कामे करण्याकडे कल राहील. विलासीवृत्ती वाढेल. वडिलोपार्जित इस्टेट मिळण्याची शक्मयता. स्वत:च्या वास्तूसाठी प्रयत्न करा. संतती व नातवंडांचे सौख्य लाभेल. तुमच्या राशीतच राहू असल्याने 8 सप्टेंबरनंतर चंद्र, राहू युती शापित दोष निर्माण करते. त्यामुळे मानसिक शांती ढळणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागेल. 18 ची अमावस्या दगदग निर्माण करेल. गुरुपुष्यामृत योगावर मोठय़ा कामाची सुरुवात कराल. 26 नंतर शुक्राचे पंचमातील आगमन प्रेमप्रकरणे व कलाक्षेत्रासाठी अनुकूल राहील.


डिसेंबर-3 तारखेची पौर्णिमा लाभात होत असल्याने पैसा बऱयापैकी मिळेल. 7 तारखेचा गुरुपुष्यामृत योग कुटुंबात आनंदी वातावरण ठेवेल. वक्री बुधामुळे 10 तारखेच्या आसपास मानसिक संभ्रम राहील. 8 ची अमावास्या आरोग्याच्या बाबत किंचित त्रासदायक. पण आर्थिक बाबतीत उत्तम. या महिन्यात रवि, शनि, शुक्राचा योग, नोकरी व्यवसायात खळबळ माजवेल. चतुर्थातील मंगळ, गुरु  वास्तुविषयक अडलेल्या कामांना गती देईल. कौटुंबिक वादविवाद मिटतील. संतती नसणाऱयांना आनंदी वार्ता कळेल. अचानक बदललेल्या आर्थिक धोरणामुळे निर्बंध राखावे लागतील. कालसर्प योगाचा प्रभाव सुरू आहे. त्यामुळे काही शापित योगही दिसून येतील. सावध रहा. सप्तमातून होणारे केतूचे भ्रमण किरकोळ कारणावरून वैवाहिक जीवनात मोठा गोंधळ माजवेल. त्यासाठी गणेश आराधना चालू ठेवा. हे नववर्ष तुम्हाला सर्व बाबतीत फायदेशीर ठरेल, असे ग्रहमान आहे. प्रयत्न करा.

Related posts: