|Sunday, September 22, 2019
You are here: Home » उद्योग » नोटाबदली भारतासाठी हानीकारक धोरण : सुब्बाराव

नोटाबदली भारतासाठी हानीकारक धोरण : सुब्बाराव 

हैदराबाद / वृत्तसंस्था :
1991 च्या आर्थिक सुधारणांनंतर नोटाबदली हा सर्वात मोठा हानीकारक आणि धोकादायक उपक्रम राबविण्यात आला असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबदलीची घोषणा करत रिझर्व्ह बँकेला चलनातील 86 टक्के मूल्याच्या नोटा बदलाव्या लागल्या. 1991 च्या आर्थिक सुधारणांनंतर घेण्यात आलेला हा सर्वात मोठा हानीकारक निर्णय होता असे त्यांनी म्हटले. नोटाबदलीचा निर्णय हा सर्जनशील हानीकारक होता. मात्र यामुळे काही प्रमाणात काळा पैसा रोखण्यात सरकारला यश आले आहे. भारतीय अर्थव्यवस्था डिजिटल करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र हा देयकांसाठी डिजिटायजेशन करणे आर्थिकदृष्टय़ा अशक्य बाब आहे. सध्या यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. याचबरोबर समाजातील आर्थिकदृष्टय़ा खालच्या पातळीसाठी डिजिटल होणे कठीण गोष्ट आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे असे त्यांनी म्हटले.