|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चाटे समूहाचे क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय यश : गायकवाड

चाटे समूहाचे क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय यश : गायकवाड 

कोल्हापूर :

चाटे शिक्षण समूहाने शैक्षणिक क्षेत्राबरोबर क्रीडा क्षेत्रातही यश मिळविले आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा विभागप्रमुख पी. टी. गायकवाड यांनी केले. भास्कराचार्य प्रति÷ान संचलित हनुमंतराव चाटे स्कूल अँड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स कोल्हापूर यांच्या वतीने वार्षिक क्रीडा स्पर्धा झाल्या. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी विविध प्रकारचे खेळ आयोजित करण्यात आले होते. त्यात विविध माध्यमातील 850 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. येथील चाटे शिक्षण समूहचे विभागीय संचालक प्रा. भारत खराटे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जडणघडणीमध्ये अभ्यासाइतकेच खेळालादेखील महत्त्व आहे. या खेळामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होते.

छत्रपती पुरस्कारप्राप्त संभाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले. समीर यादव, सर्जेराव राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांचे कौतुक केले. प्राचार्य बी. एस. वडगावे, प्रा. सर्जेराव राऊत, सौ. प्रज्ञा गिरी, वसंत जाधव, जे. के. सूर्यवंशी, सौ. उज्ज्वला गायकवाड, अशोक साबळे, अनिल खैरे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा झाला.

यावेळी शाळेतील विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व शाळेतील क्रीडा शिक्षक, वर्गशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. अंकुश निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले.

Related posts: