|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » समिती गठीत करून दिव्यांगांचे प्रश्न सोडवू

समिती गठीत करून दिव्यांगांचे प्रश्न सोडवू 

प्रतिनिधी / :कोल्हापूर :
दिव्यांगांनी 333 केबिनची मागणी केली होती. त्यापैकी 173 केबिन मंजूर केल्या. या केबिन देण्यासाठी महापालिका प्रशासन अधिकाऱयांनी चुकीचा सर्वे करून अडगळीच्या ठिकाणी जेथे एक रूपयाही व्यवसाय होणार नाही, अशा ठिकाणी केबिन लावल्या आहेत. त्यामुळे दिव्यांग व्यक्ती स्वालंबनापासून अलीप्तच राहिले आहेत, अशा अनेक प्रश्नांच्या पाढा दिव्यांग व्यक्तींनी बुधवारी झालेल्या बैठकीत महापौर हसीना फरास यांच्यासह मनपा प्रशासनासमोर वाचल्या. यावर दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती गठीत करून सर्वच प्रश्नांची सोडवणूक करू, असे आश्वासन महापौर हसिना फरास यांनी दिले. आज दि.5 केबिन बसविणाऱया ठिकाणांचा पाहणी करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांगांच्या केबिनचा पुन्हा सर्वे करून योग्य ठिकाणी केबिन लावण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे अध्यक्ष देवदत्त माने, श्रमिक अपंग संघटनेचे युनूस खान यांनी अपंग भवन बांधून देवून त्याला आमदार बच्चू कडू यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. तसेच दिव्यांगांसाठी क्रिडा मैदान व सांस्कृतिक हॉलही बांधून द्यावा, अशीही मागणी केली. सानेगुरूजी वसाहत येथील छाया काळे यांनी आपली केबिन भाजीमंडईमध्ये असून, तेथे भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे, तेंव्हा मुख्य रस्त्यावर केबिन देण्याची मागणी केली. तसेच प्रशासन अधिकारी उध्दट वागत असल्याचेही सांगितले. कल्पना वावरे यांनी महापालिका अधिकारी गेंडय़ाचे कातडीचे असल्याचा आरोप केला. ऍड. पटेल यांना वकीली व्यवसायासाठी न्यायालय सोडून अतिक्रमणमध्ये केबिन दिली. त्यामुळे अतिक्रमणमध्ये तीनवेळा ही केबिन काढून टाकली असल्याची तक्रार करीत न्यायालयासमोर केबिन बसवून देण्याची मागणी केली. कसबा बावडा येथील शामराव पाटील म्हणाले, दिव्यांगांच्या केबिन बसवणे यासह अन्य मागण्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी, महापौर, महापालिका प्रशासन अधिकारी यांनी एकत्र बैठक घ्यावी. या बैठकीत दिव्यांगांच्या हिताचा निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी करावी, अशी मागणी केली. उपस्थित सर्वच दिव्यांग बांधव, भगिनींनी केबिनची जागा बदलून व्यवसाय होणाऱया ठिकाणी केबिन बसवून देण्याची मागणी केली. ज्या दिव्यांगांना आई-वडील, बहिण-भाऊ किंवा इतर नातेवाईक नाहीत अशा दिव्यांगांना राहण्याची सोय करावी तसेच अन्य प्रश्न प्राधान्याने सोडवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

Related posts: