|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्याचे 11,09,280 एकूण मतदार

गोव्याचे 11,09,280 एकूण मतदार 

प्रतिनिधी /पणजी :
मतदारांची अंतिम यादी गोव्यातील मुख्य निवडणूक कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आली असून येत्या 8 जानेवारीपर्यंत त्यात नवीन मतदारांचा सामावेश करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. सदर यादीनुसार गोव्यातील एकूण मतदार 11,09,280 एवढे असून त्यात पुरुष मतदार 5,45,530 तर महिला मतदार 5,62,930 एवढे आहेत. यात 820 सेवा मतदारांचाही सामावेश आहे. नवीन मतदारांना मतदानकार्ड 15 ते 20 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे. मतदारांना मतदानासाठी आवाहन करणारे एक गीतही साकारण्यात आले असून ते मतदारांकरिता वाजवले जाणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगातर्फे मोठय़ा प्रमाणात पोस्टर्स, बॅनर्स हटविण्यात आले असून सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेत अजुनही मोठय़ा संख्येने पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्स यांचा सामवेश आहे. ते सर्व लवररच हटविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार उत्तर गोव्यत सार्वजनिक जागेत 110 पोस्टर्स, 562 बॅनर्स व इतर 87 असे मिळून एकूण 759 ची नोंद आहे. दक्षिण गोव्यात 48 पोस्टर्स, 2288 बॅनर्स व 285 इतर अशी नोंद झाली आहे. त्यांची एकूण आकडेवारी 2621 अशी आहे.
खासगी जागेत सार्वजनिक जागेच्या तुलनेत कमी बॅनर्स पोस्टरर्सची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यात 106 पोस्टर्स, 161 बॅनर्स व 17 इतर अशी नोंद झाली असून दक्षिण गोव्यात 1 पोस्टर, 117 बॅनर्स, अशी नोंद आहे. त्यांची एकूण आकडेवारी अनुक्रमे 284 व 118 अशी आहे. नवीन मतदारांची नावे सामाविष्ठ होण्यासाठी 54,653 मतदारांचे अर्ज आले. त्यातील 49,921 अर्ज स्वीकारले. नावे रद्द करण्यासाठी 17008 अर्ज आले. त्यातील 15662 अर्ज स्वीकृत झाले, अशी माहिती देण्यात आली.
एकूण 10199 मतदारांचे निधन झाले तर 15004 मतदार स्तलांतरीत झाले. गोव्याची एकूण लोकसंख्या 15,14,303 असली तरी 18 वर्षावरील प्रत्यक्ष मतदारांची संख्या 10,76,448 एवढी असून नवीन मतदारांची नावे सामाविष्ठ होऊन ती संख्या आता 11,08,461 एवढी झाली आहे.

Related posts: