|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अखेर युती तुटलीच, पाठिंबाही काढला!

अखेर युती तुटलीच, पाठिंबाही काढला! 

प्रतिनिधी /पणजी :

नव्या राजकीय घडामोडीत गुरुवारी मगो पक्षाने भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांना दिलेल्या पत्रात मगोच्या तीन आमदारांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अखेर भाजप मगो यांची युती संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नव्या समिकरणांनी गती घेतली आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर होताच भाजपबरोबर असलेल्या युतीबाबत मगो पक्ष निर्णय घेईल, असे मगो उपाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी यापुर्वीच स्पष्ट केले होते. बुधवार 4 जानेवारीला निवडणूक जाहीर होताच काल गुरुवारी मगोने पाठिंबा काढून घेतला. मगोने घेतलेल्या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीत मगो-भाजप युती शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वर्षभर सुरु होता संघर्ष

मागील वर्षभर मगो आणि भाजप यांच्यादरम्यान संघर्ष सुरू होता. मगोचे दीपक ढवळीकर यांच्याकडील महत्त्वाचे असे सहकार खाते काढून घेण्यात आल्यानंतर मगोनेते प्रचंड नाराज बनले होते. त्याअगोदर साबांखामंत्रीपदी असलेल्या सुदिन ढवळीकर यांचे पंख कापण्यासाठी राज्य साधन सुविधा विकास मंडळाकडे महत्त्वाच्या विकासकामांचे प्रकल्प देण्यात आले होते.

मगोची मुस्कटदाबी सुरू झाल्यानंतर मगोच्या केंद्रीय समितीनेही भाजपच्या विरोधात विधाने करायला सुरूवात केली होती. त्याचबरोबर मगोने भाजपचा पाठिंबा काढून घ्यावा, असा तगादाही ढवळीकर बंधुंच्या मागे लावला होता. तरीही योग्यवेळी निर्णय घेऊ, असे ढवळीकर समितीला वेळोवेळी सांगत आले.

Related posts: