|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » दहा हजार झाडे लावा, मगच लग्न ; तरुणीची अजब अट

दहा हजार झाडे लावा, मगच लग्न ; तरुणीची अजब अट 

ऑनलाईन टीम / भोपाळ :

लग्न ठरवताना सर्वसाधारणपणे नवरा मुलगा किंवा त्याच्या घरच्या मंडळीकडून वधूपक्षाकडे विविध मागण्या केल्या जातात. मात्र, मध्यप्रदेशातील भिंड येथील किसीपुरा गावातील एका वधूने सासरच्या मंडळीकडे तिने दहा हजार झाडे लावण्याची मागणी केली. सासरच्या मंडळीने चक्क ती मागणी मान्यही केली.

vadhu

सामान्यपणे लग्नाच्यावेळी सासरच्या मंडळीकडून वधूपक्षाकडे विविध मागण्या करण्यात येत असल्याचे पाहतच असाल. मात्र, मध्यप्रदेशातील भिंड येथे राहणाऱया प्रियांका या तरुणीने आपल्या लग्नाची बोलणी सुरु असताना वरपक्षाकडेच दहा हजार झाडे लावा, त्यानंतर लग्न करु असे सांगितले. वधूच्या या अनोख्या मागणीने सासरची मंडळी पुरती गेंधळात पडली. पण सासरच्या मंडळींनी कोणताही विचार न करता ती अट मान्यही केली. त्यानंतर प्रियंकाचे लग्न धुमधडक्यात लावून देण्यात आले.

Related posts: