|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जागतिक पातळीवर नव्या स्थित्यंतरांचे नवे वर्ष

जागतिक पातळीवर नव्या स्थित्यंतरांचे नवे वर्ष 

2016 साल मागे सरून नुकताच 2017 चा आरंभ झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नवे वर्ष हे नव्या निर्णायक स्थित्यंतरांची पायाभरणी करणारे असेल असे दिसते. नवे वर्ष नेहमी जुन्या वर्षाच्या खांद्यावर उभे असते हे ध्यानात घेता नवी स्थित्यंतरे काय असतील याची चाहूल जुन्या वर्षातील काही घटनांवरून लागली होती. अमेरिकेच्या अध्यक्षपदी एकाधिकारशाहीकडे झुकणारे, आक्रमक प्रवृत्तीचे डोनाल्ड ट्रम्प आल्याने यापुढे लष्करी संघर्षाची व्याप्ती जगभरात अधिक वाढण्याची शक्मयता आहे. त्यांच्या चिथावणीखोर प्रवृत्तीची झलक त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर लागलीच दिली आहे. तैवानच्या राष्ट्र प्रमुखांशी त्यानी दूरध्वनीवरून नुकतीच चर्चा केली. 1970 पासून आतापर्यंत एकसंध चीन हे अमेरिकेचे धोरण आहे. परंतु ट्रम्प यानी ट्विटरवरून शिल्लक राहिलेल्या एकमेव साम्यवादी महासत्तेविरोधात जी सरबत्ती चालविली आहे ती अमेरिका-चीन संबंध अधिक कडवट वळणावर आणून ठेवणारी आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील जनरल्सची संख्या, ट्रम्प यांच्याच जातकुळीचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक फ्लीन, देशाचे उपसचिव जॉन बोल्टन ही त्यांची मांदियाळी पाहता यापुढे भूराजकीय व आर्थिक रणनीती संदर्भात पहिल्या झटक्मयातच लष्करी कारवाईचा पर्याय अमेरिकेकडून स्वीकारला जाण्याची शक्मयता अधिक वाढली आहे. ट्रम्प हे रशियाचे हुकूमशहा ब्लादिमीर पुतीन यांचे समर्थक आहेत. या दोघांच्या युतीतून जागतिक परिस्थिती अधिकच स्फोटक होण्याची भीतीही यापुढे राहील.

ट्रम्प यांच्या सुरक्षित व एकारलेल्या पवित्र्यामुळे जागतिकीकरणाच्या अपरिहार्यतेवर मोठा आघात झाला आहे. यामुळे 1939 च्या आधीचा आर्थिक राष्ट्रवाद, जबर जकातकर, व्यापारी निर्बंध, भांडवल व श्रमशक्तीच्या चलनावर निर्बंध, बंदिस्त बाजारपेठ व बंदिस्त मनोवृत्ती या इतिहासाची जागतिक पातळीवर पुनरावृत्ती होण्याची शक्मयता बळावली आहे. चीनमधील साम्यवादी पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत निर्णय होऊन वरि÷ पातळीवर नवे चेहरे निर्णायक स्थानी येतील. नेतृत्वबदलाच्या आधी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग परराष्ट्र नीतीसंदर्भातील जी आव्हाने आहेत त्यांना अधिक जोरकसपणे भिडण्याची शक्मयता आहे. त्यांनी असा पवित्रा घेतला तर दुसऱया बाजूस ट्रम्पच्या रूपाने तसाच प्रतिस्पर्धी उभा असल्याने चीन-अमेरिका संबंध धोकादायकरित्या तणावपूर्ण बनण्याचा संभव आहे.

मार्च महिन्यात ब्रिटनच्या युरोपियन युनियनपासून फारकतीस आरंभ होणार आहे. यावेळेस संचार व चलनवलन स्वातंत्र्याचा मुद्दा ज्यात ब्रिटन काटछाट करण्यास उत्सुक आहे आणि बंधमुक्त ब्रिटनची एक बाजारपेठीय प्रवेशास मोकळीक ज्याला युरोपियन युनियनचा विरोध आहे यावर टोकाच्या वाटाघाटींची शक्मयता आहे. त्याचप्रमाणे यापुढे ब्रेक्झीटवरील मतभेदांची दरी अधिक तीव्र होऊन ब्रिटनमधील समाज-राजकीय विभाजन अधिकच रुंदावेल, ब्रेक्झीटोत्तर स्थितीत अर्थतज्ञानी व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे स्टर्लिंगचे खरोखरच अवमूल्यन झाले तर त्यातून राहणीमान खर्चात वृद्धी होऊन गरीब व मध्यमवर्ग अधिकच पोळला जाईल.

या वषी फ्रान्समध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. समाजवादी पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष हॉलांदे पुन्हा निवडणूक लढवणार नाहीत. यावेळी फ्रान्समध्ये नॅशनल प्रंट या अती उजव्या पक्षाच्या मेरीन ली पेन निवडणुका जिंकून सत्ता काबीज करतील असे राजकीय निरीक्षकांना वाटते. मेरीन पेन या फ्रान्सने युरोपियन युनियन व युरो हे चलन सोडावे या मताच्या आहेत. फ्रान्समध्ये त्यांनी सत्ता काबीज केली आणि इटालीमध्येही सत्तांतर होऊन युरोविरुद्ध पक्ष सत्तेवर आला तर हा घटनाक्रम युरोपियन युनियनच्या आणि युरोझोनच्या अंताचा आरंभ ठरेल.

 फ्रान्समध्ये जी परिस्थिती आहे तीच थोडय़ाफार फरकाने जर्मनीतही आहे. यावषी चान्सलर एंजेला मार्केल सलग चौथ्या टर्मसाठी निवडणूक लढवतील. त्यांना स्थलांतरित विरोधी पक्षाचा कडवा सामना यावेळी करावा लागणार आहे. असे असले तरी निवडणुकीचे पारडे आज तरी मार्केल यांच्याकडेच झुकलेले दिसते. तथापि, आगामी काळात देशांतर्गत वाढत्या टीकाकारांची युरोपियन युनियन, स्थलांतरित व दहशतवाद याबाबतीत त्यांना मनधरणी करावी लागणार असल्याने त्यांच्या भोवतालचे पूर्वीचे वलय विरळ होत जाण्याची चिन्हे आहेत. एकूण विविध प्रकारच्या अंतस्थ अनिश्चिततेमुळे 2017 अखेरपर्यंत युरोपियन युनियन अधिकाधिक विकलांग होत जाण्याची शक्मयता आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सततच्या प्रयत्नानंतरही सीरियामधील यादवीने 6 व्या वर्षात पदार्पण केले आहे. या यादवीत रशियाच्या प्रभावी हस्तक्षेपाने पूर्वीचे सारे आयाम उलटे पालटे झाले आहेत. पाश्चात्य राष्ट्रांनी पाठिंबा देऊ केलेले बंडखोर मागे हटले असून असाद राजवट या अग्निदिव्यातून वाचण्याची शक्मयता आता निर्माण झाली आहे. मात्र सीरियातून निर्माण झालेले मानवाधिकाराचे उल्लंघन, दहशतवाद, स्थलांतर, अशांतता यांचे सावट पूर्णपणे हटलेले नाही. दुसरीकडे ट्रम्प यांच्या रशिया धार्जिण्या भूमिकेमुळे नाटो राष्ट्रांच्या एकसंधतेवर परिणाम झाला आहे. या साऱया गुंत्यातून 2017 मध्ये तरी सीरियन प्रश्नावर काही तोडगा निघेल की तो इराक, अफगाणिस्थानाप्रमाणे अस्थिर व अराजकसदृश स्थितीतच राहील हे पाहण्यासारखे ठरेल.

ओबामानी आपल्या काळात इराणशी अणूकरार करून अमेरिका-इराण संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. या कराराचा अंमल आता सुरू झाला आहे. यापुढे करारात फेरबदल करणे किंवा तो पूर्णतः उलटा फिरवणे शक्मय नाही. परंतु ट्रम्प यांनी आपल्या अखत्यारीतील कार्यकारी शक्ती पणास लावून या करारास तिलांजली दिली तर मात्र इराण-अमेरिका युद्ध हा त्याचा स्वाभाविक परिणाम असणार आहे.

इराकमध्ये आयसीसच्या ताब्यातून मोसल शहर परत घेण्यासाठी जी आघाडी उघडली होती ती पूर्णतः निष्प्रभ ठरली आहे. येमेनमधील पाश्चात्य राष्ट्रांच्या पाठिंब्याने सुरू झालेली लढाई थांबलेली नाही. लिबियामध्ये आयसीसचा प्रभाव कैकपटीने वाढला आहे. अफगाणिस्थानातून नाटो फौजा काढून घेतल्या गेल्या असल्यातरी तेथे आजही आठ हजार अमेरिकन सैनिक तैनात आहेत. दहशतवादी व तालिबान्यांचा उपद्रव  अद्याप संपलेला नाही हे गेल्या तीन महिन्यात झालेल्या काही दहशतवादी हल्ल्यांनी अधोरेखित केले आहे. तुर्कस्थानमध्ये दहशतवादी हल्ल्याची तीव्रता वाढली आहे. पाश्चात्य राष्ट्रांच्या मध्यपूर्व व पश्चिम आशियातील दहशतवाद्यांच्या मर्मस्थळावर हल्ला करण्याच्या नव्या आक्रमक रणनीतीमुळे विस्थापित झालेले दहशतवादी 2017 मध्ये मोठय़ा संख्येने युरोपात घुसण्याचा व तेथे मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी धोका नव्या वर्षाच्या भविष्यात टांगता आहे.

Related posts: