|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » काँग्रेस नगरसेवकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी

काँग्रेस नगरसेवकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी 

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेत विरोधी काँग्रेस नगरसेवकांना बैठक व्यवस्था नाही. त्यामुळे नगरसेवकांसाठी कायमस्वरुपी जागा द्या. अन्यथा मुख्याधिकाऱयांच्या केबिनमध्येच ठाण मांडू, असा इशारा काँग्रेस नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे यांची भेट घेऊन दिला आहे. नगरसेवकांसाठी वेगळी बैठक व्यवस्था केली जाईल. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन द्वासे यांनी दिले.

सावंतवाडी नगरपालिकेत उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर व सभापती यांच्यासाठी वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु नगरसेवकांसाठी बैठक व्यवस्थाच नाही. त्यामुळे काँग्रेस नगरसेवक सुधीर आडिवरेकर, गटनेते राजू बेग, नासीर शेख, ऍड. परिमल नाईक, समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर, दीपाली भालेकर, उदय नाईक यांनी गुरुवारी विषय समिती सभापती निवडीआधी पालिकेत दाखल होत मुख्याधिकारी द्वासे यांची भेट घेत कैफियत मांडली. सध्या पालिकेत स्वर्णजयंती योजनेचे कार्यालय आहे. तेथे नगरसेवकांसाठी बैठक व्यवस्था करावी, असे काँग्रेस नगरसेवकांनी सूचित केले.

Related posts: