|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कवी विद्याधर करंदीकर यांच्यावर कोलाज

कवी विद्याधर करंदीकर यांच्यावर कोलाज 

कणकवली : कवी विद्याधर करंदीकर यांचे साहित्य कर्तृत्व वादातीत आहे. त्यांचा व्यासंग आणि त्यांची साहित्याची जाण यामुळे ते आपल्या हयातीत सांस्कृतिक क्षेत्रात मार्गदर्शक म्हणूनच वावरले. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतरही त्यांच्याबाबत भरभरून लिहिले गेले आणि बोलले गेलेही. मात्र, त्यांच्या कर्तृत्वाची दखल बालकलाकारांनाही घ्यावीशी वाटली असून शहरातील जयेश केणी या आठवीत शिकणाऱया विद्यार्थ्याने डॉ. करंदीकर यांच्या निधनानंतर त्यांच्यावर ‘तरुण भारत’सह आणि इतर माध्यमांमध्ये आलेले आदरांजलीपर लेखन त्याचबरोबर त्यांचे साहित्य लेखन तसेच त्यांचे ग्रंथ याबाबत कोलाज बनविले असून जयेशची ही कल्पकता दाद देण्यासारखीच आहे.

जयेश केणी हा हरहुन्नरी बालकलाकार. कणकवलीतील बालचळवळीतील सुषमा केणी यांचा मुलगा. येथील एस. एम. हायस्कूलमध्ये तो सध्या आठवीत शिकत असून शाळेत मराठी विषय शिक्षक शिकवित असतानाच त्याला डॉ. करंदीकर यांच्या संदर्भातील कोलाज बनविण्याची कल्पना त्याला सुचली. यासाठी त्याने करंदीकर यांच्या घरी जाऊन त्यांच्याबाबतची सर्व माहिती संकलित केली. त्यानंतर त्याने करंदीकरांवरील देखणे कोलाज तयार केले. प्रारंभी ते कसे तयार करायचे, असा त्याला प्रश्न पडला होता. पण पाठय़पुस्तकात सचिन तेंडुलकर यांच्या कर्तृत्वाचे कोलाज असलेले त्याने पाहिले आणि त्या कोलाजच्या आधारे त्याने डॉ. करंदीकर यांचे कोलाज तयार केले.

जयेशने डॉ. करंदीकर यांच्यावर बनविलेल्या कोलाजमध्ये डॉ. करंदीकर यांचे रेखाटन केलेले छायाचित्र, परिचय, त्यांच्या कविता, डॉ. करंदीकर यांना सन्मानित करतानाचे फोटो, त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांची मुखपृष्ठे, ‘तरुण भारत’चे आवृत्तीप्रमुख विजय शेट्टी यांनी डॉ. करंदीकर यांच्यावर लिहिलेल्या आदरांजलीपर लेखनासह अन्य मान्यवरांचे त्यांच्यावरील लेखन आदींचा समावेश आहे.

Related posts: