|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत भरला खाद्यमहोत्सव

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत भरला खाद्यमहोत्सव 

कुडाळकुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी ‘खाद्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनविण्याच्या या स्पर्धेमध्ये मुलांनी सक्रिय सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.

यात मुलांनी व्हेज पुलाव, कॉकटेल, फालुदा दूध कोल्ंिड्रक, पूट सॅलड, कोकम सरबत, ढोकळा, पॅटीस, अप्पे, कोबी मंचुरी, केक, भजी, भाजीपाव, हक्का नुडल्स, शेजवान राईस, शेवपुरी, पाणीपुरी, चिक्की, चॉकलेटस आदी रुचकर पदार्थ बनविले होते. सर्वांनीच मुलांच्या उत्साहाचे आणि त्यांनी घेतलेल्या परिश्रमांची प्रशंसा केली.

याचे उद्घाटन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजिज पठाण यांनी केले. परीक्षक म्हणून शिल्पा मराठे, बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री. नागराज व प्रा. सुमन यांनी काम पाहिले. पालक, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांनी या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

बॅ. नाथ पै कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य स्वरा गावडे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नागराज सूनागर आदी उपस्थित होते.

 

Related posts: