|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्रा.शशिकांत यर्नाळकर स्मृती एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन

प्रा.शशिकांत यर्नाळकर स्मृती एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन 

वेंगुर्ले : येथील ‘कलावलय’ संस्थेने गेली 21 वर्षे एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून वेंगुर्ल्यामध्ये नाटय़ चळवळ सुरू ठेवली आहे. संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अभिनेते अनिल गावडे यांनी येथे केले.

‘कलावलय’ संस्थेने येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या प्रा. शशिकांत यर्नाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी गावडे बोलत होते. यावेळी ‘कलावलय’चे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर, माजी अध्यक्ष रमेश नार्वेकर, परीक्षक शैलेश दुपारे, सौरभ भावे, बी. के. सी. असोसिएशनचे सतीश डुबळे, नीला यर्नाळकर, नगरसेविका श्रेया मयेकर, प्रशांत आपटे उपस्थित होते.

गिरप यांनी, कलावलय संस्थेने यापुढे एकांकिका स्पर्धेबरोबरच राज्यस्तरीय नाटय़ स्पर्धेचे आयोजन करावे. त्यासाठी नगरपरिषद सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. यावेळी ‘कलावलय’चे माजी अध्यक्ष रमेश नार्वेकर यांचा गिरप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत बाळू खांबकर, सूत्रसंचालन संजय पुनाळेकर यांनी केले.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सत्कर्ष मुंबईची ‘द एक्झिक्युटर’, स्टार थिएटर्स रत्नागिरीची ‘व्हीटनेस ऑफ लव्ह’, मानसी आर्ट वेंगुर्लेची ‘प्रवास’, हेरंब नाटय़ संस्था दापोलीची ‘लाल सलाम’, बाबा वर्दम थिएटर्स कुडाळची ‘मैत’ या एकांकिका सादर झाल्या.

Related posts: