|Monday, December 16, 2019

 

  वार्ताहर/     पोर्ले तर्फ ठाणे

 

  पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील आनंदीबाई बळवंत सरनोबत गर्ल्स हायस्कूलच्यावतीने बालिका दिन व सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून पोर्ले गावातून चित्ररथ व प्रभात फेरी काढण्यात आली.

  चित्ररथामध्ये ग्रंथदिंडी, वारकरी दिंडी, पर्यावरण आशा आशयाचे उद्बोधक घोषवाक्यांचा समावेश होता. शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनीनी गावातील शिवाजी चौकात प्रबोधनात्मक कार्यक्रम केले. त्यामध्ये स्वच्छतेवर व व्यसनमुक्तीवर पदनाटय, लेक वाचवा भारूड, पसायदानावर आधारित योगासने, एन.सी.सी परेड, लेझीम, झांजपथक, नाटय़छटा, जम्परोप, अंधश्रद्धा निर्मुलन आदी विषयांवर भरगच्च कार्यक्रम झाले.

 याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज सरनोबत, मुख्याध्यापिका सिमा सांगरूळकर, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts: