|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांचे आज पत्रकारितेवर व्याख्यान

ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांचे आज पत्रकारितेवर व्याख्यान 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

तब्बल चार दशके संसदेचे वार्तांकन करणारे ख्यातनाम पत्रकार विजय नाईक यांचे शुक्रवारी (दि. 6) येथे व्याख्यान होत आहे. ‘पत्रकारिता आणि भारतीय राजकारण’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे त्याचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी असतील. शाहू स्मारक भवनात सायंकाळी पाच वाजता हे व्याख्यान होईल.

ज्यांनी दिल्ली गाजवली अशा नावाजलेल्या देशातील पत्रकारांमध्ये विजय नाईक यांचा समावेश होतो. भारतीय राजकारणातील अनेक स्थितंतरे त्यांनी अनुभवली आहेत व ती आपल्या कसदार लेखणीतून मांडली आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही त्यांचा सखोल अभ्यास आहे. उत्तर प्रदेशच्या होणाऱया आगामी निवडणुकीपासून ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयापर्यंतचा वेध ते आपल्या व्याख्यानात घेणार आहेत. यावे ‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस क्लबच्या पदाधिकाऱयांनी केले आहे.

Related posts: