|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महाराष्ट्र हागणदारी मुक्त करा : अभिनेत्री सई ताम्हणकर

महाराष्ट्र हागणदारी मुक्त करा : अभिनेत्री सई ताम्हणकर 

प्रतिनिधी/ गारगोटी

स्वच्छता हा जीवनाचा महत्वाचा पाया असुन स्वच्छता आल्यास सर्व सुख समृद्धी नांदेल, त्यामुळे प्रत्येकाच्या घरोघरी संडास असणे ही महत्वाची बाब असुन सर्वांनी प्रयत्न करून महाराष्ट्र हागणदारी मुक्त करूया असे आव्हान प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हीने केले. ताम्हणकर हेने उपस्थितांना आव्हान करून भावनात्मकही केले, त्याबरोबरच विविध छटांनी गारगोटी करांची मने जिंकली.

गारगोटी, ता. भुदरगड येथे प्राचार्य अर्जुन आबीटकर यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजित समाजातील गौरवशाली महिलांच्या सत्कार प्रसंगी व गृहिणी महोत्सवाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्य़क्षस्थानी गारगोटीच्या सरपंच सौ रूपाली दशरथ राऊत होत्या.

व्यासपिठावरील मुलाखतीत बोलताना ताम्हणकर म्हणाल्या की, मी मुळची सांगलीची असुन आबीटकर बंधुंनी गृहिणी महोत्सव भरवून महिलांच्यामध्ये जागृतीचा संदेश दिलेला आहे. इतक्या प्रचंड संख्येने महिला बघुन खरोखरच आपलेपण वाटला. येथुन पुढेही समाज कार्यात स्वच्छता अभियान राबवण्याकडे आपले विशेष लक्ष असणार आहे.

यावेळी प्राचार्य अर्जुन आबीटकर व सौ. रोहिनी आबीटकर यांच्या हस्ते सई ताम्हणकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गौरवशाली महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सौ. विजयमाला प्रकाश आबीटकर, सौ. वैशाली अजित आबीटकर, सौ. छाया सारंग, सौ. अर्चना पांगिरेकर, सौ. स्मार्थ, सौ. विजया घोलपे, राजश्री खांडके, सौ. सरिता चिले, विजयमाला चव्हाण, छाया चव्हाण, आदींसह प्रमुख मान्यवर महिला उपस्थित होत्या.

Related posts: