|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रकाश वास्कर यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर रहावे : देसाई

प्रकाश वास्कर यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर रहावे : देसाई 

प्रतिनिधी/ गारगोटी

धावपळीच्या जगात प्रत्येकजण आपल्या कामात व्यग्र असताना आपला व्याप सांभाळुन समाजकार्यासाठी अग्रेसर राहणारी समाजात दुर्मिळ माणसे आहेत.त्यापैकीच प्रकाश वास्कर हे समाज कार्याची ज्योत अखंड ठेवत आहेत असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांनी केले.

गारगोटी (शिवाजीनगर) येथे आयोजित सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वास्कर यांच्या वाढदिवसानिमित्य शालेय विद्यार्थ्यांना वह्य़ा वाटप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत गोजारे होते.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांना सुभाष पाटील, कुलदिप कामत, अमित देसाई यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. तसेच ग्रामिण रूग्णालय गारगोटी येथे फळे वाटप करण्यात आले. त्याबरोबरच शिवाजीनगर येथे घागर घेऊन धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.

यावेळी सौ. रेश्मा राहुल देसाई, दिगंबर जगताप, प्रकाश सावंत, सुभाष नाईक, सुरेश खोत, माजी उपसरपंच सुनंदा वास्कर, विनाताई सातोस्कर, मालिनी देसाई, सुशिला कलकुटकी, सागर भाट, हुसेन सय़द, दिपक कांबळे, दत्तात्रय कांबळे, अरूण वास्कर, गणेश कोरवी, अमोल कलकुटकी, संदिप करवळ, सुशांत परिट, यांच्यासह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार उत्तम वडर यांनी मानलें तर सुत्रसंचालन सचिन भांदिगरे यांनी केले.

Related posts: