|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » देवस्थानाच्या संपत्तीमधून भिकारी वर्गाचा विकास करा : डॉ प्रकाश आमटे

देवस्थानाच्या संपत्तीमधून भिकारी वर्गाचा विकास करा : डॉ प्रकाश आमटे 

पंढरपूर / प्रतिनिधी

देशामधील देवस्थानांकडे सर्वसामान्य भाविकांनी अर्पण केलेली मोठी संपत्ती आहे. यांचाच उपयोग जर देशातील एक एक गावाचा विकास करण्यासाठी खर्च केला. तर यातून भिकारी वर्ग हा मुख्य प्रवाहात येईल. आणि त्यांसाठी त्यांना देवस्थांनानी उद्युक्त करून त्यांची मानसिकता बदलायला मदत करायला हवी असे मत पदमश्री डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी व्यक्त केले आहे.

    येथील एमआयटींच्या विश्वशांती गुरूकुल येथे एका कार्यक्रमांच्या निमित्ताने आल्यावर त्यांनी येथील पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ मंदाकीनी प्रकाश आमटे , डॉ विश्वनाथ कराड , स्वाती कराड – चाटे , श्रीकांत देशमुख आदि याप्रसंगी उपस्थित होते.

   यावेळी पुढे बोलताना डॉ आमटे म्हणाले , सध्या देवस्थानांच्या ठिकाणी मोठया प्रमाणावर भिकारी , अंध , अपंग , पंगू अशा व्यक्तींची संख्या जास्त आहे. त्यानाही समाजामधे सन्मानाने जगण्यांची मुभा आहे. यासाठीच अशा व्यक्तींना समाजामधे आणण्यासाठी देशभरातील विविध ठिकाणच्या देवस्थानांनी मोठया प्रमाणावर असलेली साधन संपत्तींचा उपयोग हा भिकारी सारख्या दुलक्षित व्यक्तींना समाजाच्या प्रवाहात आणण्याची गरज असल्याचेही यावेळी डॉ आमटे यांनी सांगितले आहे.

     तसेच यावेळी पत्रकारांनी त्यांना राज्यातील दारूबंदीसंदर्भात विचारणा केली यावर उत्तर देताना ते म्हणाले , राज्यातील दारूबंदीसाठी राजकीय इच्छाशक्तींची मोठी गरज आहे. आणि ती महाराष्ट्रामधे सध्या तरी नाही. आपण बिहार सारख्या राज्याला नावं ठेवतो. मात्र आज तेथील सरकार बदलल्यावर तात्काळ दारूबंदी झाली. मग हे महाराष्ट्रात का होउ शकत नाही ? असा सवालही यावेळी डॉ आमटे यांनी उपस्थित केला.

    तसेच याप्रसंगी आदिवासी भागांच्या आणि नक्षली क्षेत्रांाबाबत बोलताना डॉ आमटे म्हणाले , आज सरकारच्या असंख्य सोयीसुविधा आहेत. मात्र याच सोयीसुविधा हया उपेक्षित समाजापर्यत पोहचत नाहीत. त्यच्यापर्यत पैसाही पोहचत नाही. आज आपल्याकडे धनधान्य मोठया प्रमाणावर उपलब्ध आहेत. तरी देखिल विषमता कमी होउ शकली नसल्यांचेही यावेळी डॉ आमटे यांनी सांगितले आहे.

  याप्रसंगी डॉ प्रकाश आमटे यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी डॉ मंदाकीनी आमटे यांनी देखिल आदिवासी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना प्रेम अणि चांगले शिक्षण देण्याची गरज आहे. कारण तेथील युवक हा जर शिकला तर बंदूक हातामधे घेउन कधीच नक्षलग्रस्त होणार नसल्यांचे डॉ मंदाकीनी आमटे म्हणाल्या आहेत.

Related posts: