|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तांबोसे येथे अपघात

तांबोसे येथे अपघात 

प्रतिनिधी/ पेडणे

शुक्रवारी सकाळी 8 वाजता तांबोसे-पेडणे येथील राष्ट्रीय हमरस्त्यावर स्लीपर कोच प्रवासी बस आणि टँकर यांच्या झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले. अपघात इतका जबरदस्त होता की तिघेजण बसमध्ये व दोघेजण टँकरमध्ये अडकून पडले. थ्यांना पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रमाने बाहेर काढले. झखमींपैकी बसमधील प्रवासी प्रिती परब, योगिता जानकडे यांना आझिलो हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. थर टँकर चालक मंगललाल यादव व साहाय्यक क्लीनर बिरींदरलाल यांना आझिलो हॉस्पिटलमधून पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे पाठवण्यात आले आहे. ड्रायव्हर व क्लीनरचे पाय प्रॅक्चर असून शरीरालाही मोठय़ा प्रमाणात दुखापत झाली आहे. मात्र त्यांच्या जीवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पुणे-गोवा स्लीपर कोच बस एमएच 07 एफ 7500 गोव्याकडे येत होती आणि पेट्रोलियम वाहतूक करणारा एमएच 04 टीएल 4983 हा गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने चालला होता. त्यावेळी बस एका दुसऱया वाहनाला ओव्हरटेक करताना टँकरला धडक दिल्याने दोन्ही वाहनांचे दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. त्यात टँकरमधील ड्रायव्हर व क्लीनरवर बसमधील तिघेजण अडकून पडले. या अपघाताचे वृत्त समजताच पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित अपघातस्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त टँकरचे पत्रे कापून ड्रायव्हर व क्लीनर तसेच बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढले. त्यांच्यावर प्रथम तुये येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर आझिलो इस्पितळात नेले. पैकी  ड्रायव्हर व क्लीनरला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. पेडणे अग्निशामक दलाचे जवान पी. एन. णांद्रेकर, आर. ए. गावस, व्ही. डी. घावकर, लक्षदीप हरमालकर, विशांत वायंगणकर, ड्रायव्हर विठ्ठल परब यांनी उत्तम कामगिरी बजावली. पेडणे पोलीस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला.

Related posts: