|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘कोमप’गोवातर्फे आजपासून शेकोटी संमेलन

‘कोमप’गोवातर्फे आजपासून शेकोटी संमेलन 

प्रतिनिधी/ पणजी

कोकण मराठी परिषद (कोमप) गोवातर्फे बारावे शेकोटी संमेलन शनिवार दि. 7 व रविवार दि. 8 जानेवारी असे दोन दिवस युथ हॉस्टेल, मिरामार येथे आयोजित करण्यात आले आहे.

शनिवार दि. 7 रोजी सायं. 4.30 वा. कांपाल येथील बालगणपतीच्या देवस्थानकडून साहित्य दिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून 5 ते 6.30 या वेळेत ‘आचार्य अत्रे यांच्या साहित्याचे विविध पैलू’ हा परिसंवादात आखण्यात आला आहे. त्याचे अध्यक्ष श्रीराम पचिंद्रे असतील. त्यात अनघा देशपांडे (नाटक), कृष्णा जोशी (मृत्यूलेख), डॉ. स्नेहा महांबरे (कऱहेचे पाणी), डॉ. सचिन कांदोळकर (विनोद), प्रा. नारायण महाले (प्रस्तावना) यांचा सहभाग आहे. त्याचे सूत्रसंचालन भारती परांजपे करतील.

सायं. 6.30 ते रात्री 8.30 या वेळेत उद्घाटन सोहळा होणार असून उद्घाटक डॉ. सुनिलकुमार लवटे हे असतील. प्रास्ताविक ऍड. रमाकांत खलप, संमेलनाध्यक्ष डॉ. कृष्णात खोत, स्वागताध्यक्ष गुरुदास नाटेकर, परिचय प्रा. नारायण महाले, आभारप्रकटन चित्रा क्षीरसागर तर सूत्रसंचालन मंगेश काळे करतील. रात्री भोजनानंतर दोडामार्ग येथील बोर्डेकर दशावतारी नाटय़ मंडळाचा दैवयोग हा नाटय़प्रयोग होईल.

रविवार दि. 8 रोजी सकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत ‘चाफा’ कविसंमेलन होणार असून त्याचे अध्यक्ष शशिकांत तिरोडकर हे आहेत. 8.30 ते 9.30 चहापान झाल्यानंतर 9.30 ते 11.30 ‘मिळून साऱयाजणी’ हा महिलांचा परिसंवाद होणार आहे. सकाळी 11.30 ते दु. 1.30 या वेळेत ‘ई-माध्यमांचा चक्रव्यूह आणि युवक’ हा परिसंवाद होणार असून त्याचे अध्यक्षपद प्रा. कृष्णाजी कुलकर्णी भूषवणार आहेत.

दुपारी 2.30 ते दु. 3 ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान सोहळा होणार असून द. वा. तळवणेकर, दामू मानगादकर हे ज्येष्ठ शिक्षक त्याचे मानकरी आहेत. दु. 3 ते सायं. 4 दरम्यान समारोप, खुले व्यासपीठ व ठराव असा कार्यक्रम असून त्यानंतर निमंत्रितांच्या कवी संमेलनाने शेकोटी संमेलनाची सांगता होणार आहे. मेघना कुरुंदवाडकर या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

डॉ.सुनिलकुमार लवटे यांचा अल्पपरिचय

दि. 11 एप्रिल 1950 रोजी पंढरपूर जि. सोलापूर येथे जन्मलेल्या डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी गत 50 वर्षात शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात मारलेल्या उत्तुंंग भरारीनेच त्यांच्यातील प्रज्ञेचा प्रत्यय येतो. त्यांनी एम.ए., पीएच.डी.(हिंदी) इतके उच्च शिक्षण घेतले असून त्यांनी आजवर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य प्रोबेशन ऍण्ड आफ्टर केअर असोसिएशन, शिवाजी विद्यापीठाच्या विविध विषयांच्या संशोधनाचे मार्गदर्शक यांसारख्या शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक संस्थांवर विविध पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. तसेच त्यांनी विविध शिक्षण संस्थेत अध्यापनाचे काम देखील केले आहे. आजवर त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे. त्याचप्रमाणे विविध नियतकालिकांतून वैचारिक मार्गदर्शन केले आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवरुन विविध चर्चासत्रात सहभाग घेतला आहे.

Related posts: