|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मुंबईच्या अंतरंग थिएटर्सची ‘घुसमट’ प्रथम

मुंबईच्या अंतरंग थिएटर्सची ‘घुसमट’ प्रथम 

कुडाळ : कुडाळ येथील निर्मिती थिएटर्सच्यावतीने नाटय़कलाकार विजय कुडाळकर व उमेश पावसकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मुंबई येथील अंतरंग थिएटर्सच्या ‘घुसमट’ने बाजी मारली. मालवण येथील कलांकुर ग्रुपच्या ‘क ला काना का?’ ने द्वितीय, तर सांगली येथील श्री भगवती क्रिएशनच्या ‘दर्या’ने तृतीय क्रमांक मिळविला. गेले चार दिवस येथील मराठा समाज सभागृहात आयोजित या स्पर्धेत सिंधुदुर्गसह राज्यातील सतरा संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे-उत्तेजनार्थ 1. ‘द एस्कीक्यूशन’ (सत्कर्व, मुंबई), 2. ‘भस्मासूर मोहिनी’ (माध्यमिक विभाग व ज्युनिअर कॉलेज, कनेडी) व 3. ‘कविता’ (रसिक रंगभूमी, रत्नागिरी), दिग्दर्शन ः 1. शेखर बेटकर (घुसमट), 2. सचिन टिकम (क ला काना का?), 3. यशोधन गडकरी (दर्या), अभिनय ः पुरुष ः 1. आकाश सावंत (द एस्कीक्यूशन), 2. नीलेश पवार (राजा, मैत्रीपार्क-देवगड), 3. रोशन कांबळे (घुसमट), स्त्राr ः 1. शुभदा पवार (क ला काना का), 2. शुभांगी चव्हाण (क ला काना का), 3. प्रांजली किन्नरीमठ (दर्या), तांत्रिक ः 1. भगवती क्रिएशन (सांगली), 2. कलांकूर ग्रुप (मालवण) व 3. सत्कर्व (मुंबई). विशेष लक्षवेधी भूमिकेबद्दल विठ्ठल गावकर (भस्मासूर मोहिनी, कनेडी) या बालकलाकाराला गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून विजयकुमार नाईक व अमित देसाई यांनी काम पाहिले.

बक्षीस वितरण सॅमसंग कॅफे (कुडाळ)चे संचालक शैलेश तिरोडकर यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट, डॉ. गुरुराज कुलकर्णी, उद्योजक संतोष सामंत, डॉ. संजीव आकेरकर, डॉ. संजय सावंत, राजन नाईक, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, श्रीकृष्ण कुंटे, सुभाष सावंत-प्रभावळकर, परीक्षक नाईक व देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तत्पूर्वी मृणाल सावंत हिने नृत्याविष्कार सादर केला. यावेळी मृणाल तसेच झी गौरव पुरस्कारप्राप्त नामदेव रोटे (प्रकाश योजना) यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. कुलकर्णी यांनी निर्मितीने एकांकिकेचा प्रवास यशस्वी केला आहे. असे सातत्य कायम राखावे. चांगल्या एकांकिका पाहायला मिळाल्या, असे सांगितले. श्री. वालावलकर, डॉ. आकेरकर यांनीही मार्गदर्शन केले. नाटक हे पाहणे व ऐकण्याचे साधन नव्हे, तर ते अनुभवण्याचे माध्यम आहे. नाटकाचा विषय त्यानुसार सादरीकरण करा, असे आवाहन परीक्षक नाईक यांनी केले.

प्रास्ताविक नागेश नाईक, सूत्रसंचालन सचिन मदने यांनी केले. निर्मितीचे अंकुश कुंभार, देवेंद्र परब, अशोक कुडाळकर, दीपक राऊळ, पप्पू स्वार, विपुल धुरी, धोंडू रेडकर (गुरुजी), प्रवीण वेंगुर्लेकर, नागेश नेमळेकर, अनिल सावंत, महेश कुंभार, मिलिंद बावकर, अमोल बांदेकर, शशी हरमलकर, अमित जळवी, सचिन गडेकर, साई साळुंखे, गणेश बोवलेकर, विनोद कदम, सिद्धेश नाईक, श्रेयस व श्रृतिका विजय कुडाळकर आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी निर्मिती थिएटर्सच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

                 खासदार राऊत यांची भेट

या स्पर्धेला खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. कोकण ही सांस्कृतिक कलेची खाण आहे. या भूमीतील अनेक कलाकारांनी विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. ही सांस्कृतिक चळवळ वृद्धींगत होण्यासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Related posts: