|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » अभिनेता ओम पुरींच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह

अभिनेता ओम पुरींच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह 

प्रतिनिधी/ मुंबई

बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांचा भलेही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असला तरी, त्यांच्या डोक्याला जखम झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एडीआर दाखल करीत याचा अधिक तपास सुरू केला आहे. तसेच शवविच्छेदन अहवाल आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर सत्य परिस्थिती बाहेर येईल, असा होरा पोलिसांनी काढला आहे.

ओम पुरी यांचे ओशिवरा येथील ओकलंड इमारतीत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने चित्रपटसृष्टीसह चाहत्यांना मोठा धक्काच बसला. या ओकलंड इमारतीच्या तिसऱया मजल्यावर ओम पुरी हे एकटेच राहत होते. अशातच त्यांचा चालक शुक्रवारी सकाळी या ठिकाणी आला असता ओम पुरी हे बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळले. तसेच त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू होता. यामुळे घाबरलेल्या चालकाने तात्काळ याची माहिती त्यांचे नातेवाईक आणि पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मृतदेहाची तपासणी केली असता, त्यांच्या डोक्याला जखम झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे पोलिसांनी तात्काळ एडीआर दाखल करीत ओम पुरी यांचा मृतदेह विच्छेदन अहवालासाठी कुपर रुग्णालयात पाठविला.

यावेळी मद्यधुंदावस्थेत ओम पुरी हे डोक्यावर आदळल्याने जखम झाली आहे की, यामागे आणखी काही कारण आहे ? याचा तपास करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे प्राथमिक तपासात ओम पुरी यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related posts: