|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पंतप्रधान मोंदींच्या निर्णयाचा गडहिंग्लज काँग्रेसने केला निषेध

पंतप्रधान मोंदींच्या निर्णयाचा गडहिंग्लज काँग्रेसने केला निषेध 

प्रतिनिधी / गडहिंग्लज

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरो रोजी 500 व 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्या व देशातील काळा पैसा बाहेर काढल्याचा आव आणला. यामुळे देशात आर्थिक आणीबाणी तयार झाली. पंतप्रधानांनी 50 दिवसात सर्व परिस्थिती पुर्वपदावर आणण्याची ग्वाही दिली पण ते फोल ठरल्याचे सांगत या निर्णयाचा निषेध गडहिंग्लज येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.

काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बी. एन. पाटील – गिजवणेकर, शहर अध्यक्ष बसवराज आजरी, उदयकुमार देसाई, विद्याधर गुरबे, अजित बंदी, दयानंद पट्टणकुडी, महेश तुरबतमठ, रावसाहेब पाटील, तानाजी कुराडे, प्रशांत देसाई, राजशेखर यरटे, इम्रान मुल्ला, अरूण बेल्लद, आप्पासाहेब बारामती यांच्यासह आदींच्या सहय़ांचे निवेदन तहसिलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आले. बँकांच्या एटीएम समोर पैशासाठी आजही सर्वसामान्य नागरीकांच्या रांगा लागल्या आहेत. नागरीकांचे हाल झाले. या सर्व परिस्थितीत शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, छोटे व्यावसायीक, मध्यमवर्गीय नागरीकांना नाहक त्रास भोगावा लागला. या अपत्तीजनक परिस्थितीमध्ये गोंधळलेल्या मानसिकतेत 50 दिवसात 63 वेळा नोटांच्या संदर्भात विविध आदेश काढण्यात आले. यात भाजपा सरकार अपयशी ठरले तर जनतेचे लक्ष विचलित करत कॅशलेस चे खुळ डोक्यात घातले. या सर्व परिस्थितीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असून हेच का तुमचे ‘अच्छे दिन ?’ याचे उत्तर आम्हास हवे असल्याची विचारणा काँग्रेसने केली आहे. या विवेकशून्य निर्णयाचा जाहिर निषेध गडहिंग्लज तालुका राष्ट्रीय काँग्रेसने निवेदनातून केला आहे.

Related posts: