|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हा बँकेची ईडी कडून तपासणी

जिल्हा बँकेची ईडी कडून तपासणी 

प्रतिनिधी/ सांगली

पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकेच्या 67 कोटीपैकी 52 कोटीचा भरणा केला याची चौकशी अमंलबजावणी संचलनालयाने सुरू केली आहे. दरम्यान बँकेच्या 18 शाखांची यापूर्वी नाबार्ड आणि आयकरने तपासणी केली असून यामध्ये काहीही आढळुन आले नाही. आता पुन्हा ही चौकशी सुरू केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशे नोटांवर दि आठ नोव्हेंबरच्या रात्री पासून  बंदी घालण्याचा तसेच या नोटा स्विकारण्यास निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर जिल्हबँकेत आठ दहा दिवस बंदी घातेल्या नोटी स्विकारण्यात आल्या. या कालावधीत बँकेच्या काही शाखात प्रमाणापेक्षा जादा भरणा केल्याचा संशय आल्याने नाबार्डने बँकेच्या नाणेवारीची अचानक तपासणी सुरू केली नाबार्डने पहिल्या टप्प्यात बँकेच्या सांगली -मिरज रोडवरील प्रधान कार्यालयातील शाखा, तसेच इस्लामपूर, तासगाव मार्केट, सावळज, कवठेमहाकांळ आणि मिरज या सहा शाखांची तपासणी केली आता आणखी आठ शाखांची तपासणी करण्यात केली ज्या शाखांमध्ये एक कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा झाली अशा 60 टक्के शाखांची तपासणी केली .

 जादा रक्कम जमा झालेल्या शाखांची 19 इतकी संख्या असून यातील कडेगाव, विटा, तासगाव, सांगली मार्केट यार्ड, यासह आठ शाखांची तपासणी केली जाणार आहे.  नोटाबंदीच्या निर्णयानंतर या शाखात हजार आणि पाचशेच्या किती नोटांचा भरणा झाला. खातेदारांची पॅनकार्ड आहेत का, केवायसी पूर्ण केली आहे का यासह अन्य मुददयांची तपासणी करण्यात  आली. याचा अहवाल पाठविला यानंतर गेल्या आठवडयात एक लाखाच्या वरती रक्कम भरलेल्या खातेदार आणि त्यांची केवायसीची तपासणी झाली याशिवाय आयकरनेही तपासणी केली. आता पुन्हा ईडी मार्फत चौकशी सुरू झाली आहे.

Related posts: