|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » संगणक नाही… नेट नाही… तरीही शिक्षण विभाग ऑनलाईन

संगणक नाही… नेट नाही… तरीही शिक्षण विभाग ऑनलाईन 

संजय पवार / सोलापूर

शासनाने प्राथमिक शाळांचे सर्वच कामकाज ऑनलाईन केलय… विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ऑनलाईन… उपस्थिती ऑनलाईन… भोजन माहिती ऑनलाईन… पण, शाळेत वीजेचे कनेक्शन नाही… संगणक नाही… नेटचा तर पत्ताच नाही… एवढेच काय….? मुख्याध्यापक आणि शिक्षक ही नाही… ही अवस्था जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षणाची….

जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षणात प्रचंड दुरावस्था निर्माण झाली आहे. जिल्हय़ात दोन हजार 836 प्राथमिक शाळा आहेत. यामध्ये मराठी, कन्नड आणि उर्दु या माध्यमिक शाळांचा समावेश आहे. यापैकी अनेक शाळांच्या डोक्यावर छतही नाही. वाडय़ावस्त्यावरील प्राथमिक शाळा तर आजही भाडय़ाच्या खोलीत चालविल्या जात आहेत. जिल्हय़ाच्या प्राथमिक शिक्षण विभागातील या शाळातील तब्बल 706 पदे रिक्त आहेत. यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांचा प्रामुख्यांने समावेश आहे.

शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता उपस्थित शिक्षक भरून काढत आहेत. पण, शाळेत वीजेचा पत्ता नाही.. संगणक नाही… नेट कनेक्शन नाही या प्राथमिक सुविधाच नसताना शासनाने शाळेचे संपूर्ण कामकाज मात्र ऑनलाईन पध्दतीने केले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शिक्षक शाळे ऐवजी शहरातील नेट कॅफेमध्ये अधिक काळ दिसून येत आहेत. शासन निर्णय निर्णयानुसार विद्यार्थ्याना देण्यात येणाऱया सावित्रीबाई फुले, अपंग, गुणवत्ता आणि अस्वच्छ पालक आदी शिष्यवृत्त्या ऑनलाईन पध्दतीने देण्यात येतात. याशिवाय शाळेतील मध्यान्ह भोजनची माहिती, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिता। सरल प्रणाली याची माहितीही ऑनलाईन पध्दतीने द्यावी लागते पण, ग्रामीण भागातील शाळातून प्राथमिक सुविधाच नसल्याने शाळांची नव्हे तर प्राथमिक शिक्षण विभागाचीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

सद्या प्राथमिक शाळांतून ऑनलाईन माहिती देण्यासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांना ही सर्व माहिती ऑनलाईन भरण्यासाठी जवळच्या शहराकडे किंवा तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. पण, सद्या मुख्याध्यापकांच्यावर वर्ग संभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे सहकारी शिक्षकांच्यावर वर्गाची जबाबदारी सोपवून या मुख्याध्यापकांना शहराकडे धाव घेऊन नेट कॅफेचा आधार घ्यावा लागत आहे. याशिवाय यासाठी येणाऱया खर्चाचीही पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे एका एका वर्गात दोन ते तीन वर्गाचे विद्यार्थी बसवून शिक्षकांना शाळा संभाळाव्या लागत आहेत.

जिल्हय़ातील काही शाळांमधून वीज कनेक्शन आहे. पण, त्याचे बील मात्र व्यावसायिक पध्दतीने आकरले जात आहे. याबाबत यापूर्वीच सभागृहामध्ये वीज बील कमी करण्याचे आश्वासन दिले होते. पण, अद्याप पर्यत त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे अनेक शाळांनी अनुदान मिळत नसल्याने वीज वापरनेच बंद केले असल्याची बाबही समोर आली आहे.

राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे रविवारी सोलापूरच्या जिल्हा दौऱयावर येत आहेत. खासगी शिक्षकांच्या अधिवेशनासाठीच येत आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षणाच्या दुरावस्थेकडे ते लक्ष देणार का? असा प्रश्न सद्या जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षकांतून उपस्थित केला जात आहे.

 

Related posts: