|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रमोद मुतालिक यांना जीवे मारण्याची धमकी

प्रमोद मुतालिक यांना जीवे मारण्याची धमकी 

प्रतिनिधी/ बेळगाव

श्रीराम सेनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधी शनिवारी उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

5 जानेवारी रोजी सकाळी 8.30 ते सायंकाळी 7 या वेळेत प्रमोद मुतालिक यांच्या मोबाईलवर कॉल करून त्यांना अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आली आहे. जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. या घटनेनंतर प्रमोद मुतालिक यांनी तातडीने उद्यमबाग पोलिसांशी संपर्क साधून यासंबंधी तक्रार केली होती.

सुरुवातीला अर्ज स्वरुपात पोलिसांनी या तक्रारीचा स्वीकार केला होता. नंतर न्यायालयाची परवानगी घेऊन शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक निरंजन पाटील पुढील तपास करीत आहेत. 5 जानेवारी रोजी प्रमोद मुतालिक यांच्या मोबाईलवर आलेल्या फोन कॉलचा तपशील मागविण्यात येत आहे. संपूर्ण तपशील उपलब्ध झाल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देणाऱया गुन्हेगारांचा शोध घेण्यात येणार आहे. धमकीचा कॉल आला त्यावेळी प्रमोद मुतालिक हे चन्नम्मानगर येथे होते. त्यामुळे उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.