|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » विनायम मेटे उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर

विनायम मेटे उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत. मेटे-ठाकरे यांच्या भेटीमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

mete

मंत्रिपदाचे गाजर दाखवत महायुतीत समावेश करुन घेण्यात आलेल्या मेटेंना अद्यापही मंत्रिपद मिळाले नाही. असे असले तरी अरबी समुद्रामध्ये शिवस्मारकाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमालाही मेटेंना साधे आमंत्रणही देण्यात आले नाही. त्यानंतर अस्वस्थ झालेल्या मेटेंनी आज अखेर ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. मेटे-ठाकरे भेटीमुळे अनेक राजकीय तर्कविर्तकांना उधाण आले आहे.

Related posts: