|Monday, December 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » उत्तरप्रदेशात भाजप विरोधात प्रचार करणार आप

उत्तरप्रदेशात भाजप विरोधात प्रचार करणार आप 

लखनौ :

 आम आदमी पक्ष पंजाब आणि गोव्यात पूर्ण शक्तिनिशी विधानसभा निवडणूक लढवत आहे. परंतु उत्तरप्रदेशात देखील पक्ष आपली भूमिका वाढवत आहे. पक्ष भले या राज्यात निवडणूक लढवत नसला तरी भाजपला पराभूत करण्यासाठी प्रचार करणार आहे. पंजाब आणि गोव्यात 4 फेबुवारी रोजी मतदान होईल तर उत्तरप्रदेशात मतदानाची सुरुवात 11 फेब्रुवारीपासून होईल. पंजाब आणि गोव्यातील मतदान पार पडल्यानंतर आम आदमी पक्षाचे मोठे नेते आणि स्टार प्रचारक उत्तरप्रदेशात भाजपविरोधात निवडणूक प्रचारात उतरतील. आपच्या दिग्गज नेत्यांच्या दौऱयांचे कार्यक्रम लवकरच ठरतील, जवळपास सर्व नेते उत्तरप्रदेश निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. आप प्रवक्त्यानुसार पक्ष उत्तरप्रदेशच्या लोकांना भाजपचा खरा चेहरा दाखवेल आणि जर भाजप सत्तेत आला तर राज्यासाठी ते किती वाईट ठरेल याची माहिती देईल. भाजप उत्तरप्रदेश निवडणुकीत नोटाबंदीला मोठा मुद्दा बनवत आहे तर आप याला देशाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा ठरवत आहे. उत्तरप्रदेश निवडणुकीत आप एक वेगळ्या प्रकारच्या राजकारणाचे दर्शन घडवेल, जेथे एक पक्ष आपली ऊर्जा आणि आपल्या साधनांचा वापर कोणत्याही लाभाशिवाय करेल असा दावा आप प्रवक्त्या महेश्वरी यांनी सांगितले.

 

 

Related posts: