|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » ओडिशात दिव्यांगाला रेल्वे पोलिसांची मारहाण

ओडिशात दिव्यांगाला रेल्वे पोलिसांची मारहाण 

बालासोर

: ओडिशाच्या बालासोर येथील रेल्वे पोलिसांनी एका दिव्यांगाला प्रचंड मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दिव्यांग व्यक्तीवर मोबाईलचोरीचा आरोप होता. ही घटना 3 जानेवारी रोजी घडली असून रेल्वे पोलिसांच्या मारहाणीची चित्रफित रविवारी समोर आली. चित्रफितीत दोन पोलीस कर्मचारी एका दिव्यांगाला मारहाण करताना दिसून आले. वृत्तानुसार या दिव्यांगावर मोबाईलचोरीचा आरोप होता. यानंतर तेथील रेल्वे पोलिसांच्या दोन जवानांनी या व्यक्तीला पकडले. चित्रफितीत रेल्वे पोलीस या दिव्यांगाला लाथांनी तुडवताना दिसत आहेत. 24 सेकंदाच्या या चित्रफितीत रेल्वे पोलीस कर्मचाऱयांनी दिव्यांगाच्या चेहऱयावर देखील लाथा मारल्याचे आढळले. मारहाण केल्यानंतर पोलीस कर्मचारी तेथून निघून गेले. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात उत्तरप्रदेशच्या बस्ती येथे पोलिसांच्या मारहाणीचे एक प्रकरण समोर आले होते. पोलीस स्थानकात पोहोचलेल्या महिलेला पोलिसांनी तेंडात सळी खूपसून मारहाण केली होती.

 

Related posts: