|Friday, December 6, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » ममता समर्थक इमामाने काढला पंतप्रधानांचे मुंडन करण्याचा फतवा

ममता समर्थक इमामाने काढला पंतप्रधानांचे मुंडन करण्याचा फतवा 

कोलकाता :

 तृणमूल काँग्रेसचे पाठिराखे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे समर्थक टीपू सुल्तान मशिदीचे शाही इमाम मौलाना नूरुर रहमान बरकती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात फतवा जारी केला. जो पंतप्रधानांचे मुंडन करेल त्याला 25 लाख रुपयांचे इनाम दिले जाईल असे प्रक्षोभक वक्तव्य त्यांनी केले. शाही इमाम फतवा जारी करत असताना तृणमूल खासदार इद्रिस अली देखील उपस्थित होते आणि त्यांनी टेबलावर थाप मारून त्याचे समर्थन केले. फतवा जारी करण्याबद्दल बोलताना बरकती यांनी पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा करून पाप केले असून हा फतवा त्याचीच शिक्षा असल्याचे म्हटले. ऑल इंडिया मायनॉरिटी फोरम आणि ऑल इंडिया मजलिस-ए-शूराच्या एका कार्यक्रमात हे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले. जो व्यक्ती हा फतवा अंमलात आणेल त्याला दोन्ही संघटना 25 लाख रुपयांचे इनाम देऊ असेही त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टिप्पणी करणारे भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांच्या विरोधात फतवा जारी करत त्यांना दगड मारावे असे बरकती यांनी सांगितले होते.

Related posts: