|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पेट्रोल पंपधारकांचा डिजिटल इंडियाला धक्का

पेट्रोल पंपधारकांचा डिजिटल इंडियाला धक्का 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून इंधन खरेदी केल्यास बँकाकडून पेट्रोल पंप मालकाला अधिभार द्यावा लागतो. क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या सहाय्याने व्यवहार केल्यास बँका अधिभार आकारतात. बँकांनी हा अधिभार आपल्याकडून घेण्याचे बंद न केल्यास सोमवारपासून कार्डच्या सहाय्याने इंधन विक्री बंद करण्याचा इशारा पेट्रोल पंप मालकांनी सरकारला दिला आहे. यामुळे मोदी सरकारच्या डिजिटल इंडियाला हा धक्का असल्याचे मानले जात आहे.

नोटाबदलीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सरकारने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले. यानुसार डिजिटल माध्यमाच्या सहाय्याने व्यवहार केल्यास सरकारकडून सवलत देण्यात आली. मात्र पेट्रोल पंपावर क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या सहाय्याने ग्राहकांनी इंधन खरेदी केल्यास बँकांना अधिभार द्यावा लागत होता. पेट्रोल पंपधारकांना प्रतिलिटरच्या सहाय्याने नफा मिळतो. मात्र त्याच्यावरही पुन्हा बँकांना अधिभार लादला होता. त्यामुळे मालकांना मिळणाऱया नफ्यात घसरण झाली होती. यामुळे पेट्रोल पंप मालक वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दिल्लीतील पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱयांना बँकांच्या या अंमलबजावणीविषयी कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस कार्डच्या सहाय्याने इंधन खरेदी केल्यास 0.75 टक्के सूट देण्याचे सरकारने घोषित केले होते.

 

Related posts: