|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय स्क्वॅश संघाला तीन पदके

भारतीय स्क्वॅश संघाला तीन पदके 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

19 वर्षांखालील वयोगटाच्या प्रतिष्ठेच्या ब्रिटिश कनिष्ठांच्या खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्ण, रौप्य आणि कास्य अशी सर्व तीन पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताचा व्ही. सेथिंलकुमारने ड्रिस्डेल चषक मिळविला. हा चषक मिळविणारा सेथिंलकुमार हा भारताचा तिसरा स्क्वॅशपटू आहे. यापूर्वी अनिल नायर आणि सौरव घोशाल यांनी हा बहुमान मिळविला होता.

या स्पर्धेत अंतिम फेरीत सेथिंलकुमारने बिगर मानांकित भारताच्या अभय सिंगचा 15-13, 11-2, 10-12, 11-7 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. अभय सिंगने रौप्यपदक तर आदित्य राघवनने कास्यपदक मिळविले.

Related posts: