|Thursday, December 12, 2019
You are here: Home » क्रिडा » रियल माद्रीदचा विजय

रियल माद्रीदचा विजय 

वृत्तसंस्था/ माद्रीद

ला लीगा फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात स्पेनच्या रियल माद्रीद संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना ग्रेनेडाचा 5-0 असा दणदणीत पराभव केला. या विजयामुळे रियल माद्रीदने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 16 सामन्यांतून 40 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. बार्सिलोनाचा संघ 34 गुणांसह दुसऱया स्थानावर तर सेव्हिला 33 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे.

शनिवारच्या सामन्यात रियल माद्रीदच्या इस्कोने बेंझेमाच्या पासवर 12 व्या मिनिटाला आपल्या संघ्घचे खाते उघडले. 20 व्या मिनिटाला बेंझेमाने दुसरा गोल नोंदविला. ख्रिस्टीयानो रोनाल्डोने रियल माद्रीदचा तिसरा गोल नोंदविला. या स्पर्धेतील रोनाल्डोचा हा 11 वा गोल ठरला. 31 व्या मिनिटाला इस्कोने रियल माद्रीदचा चौथा गोल केला. 58 व्या मिनिटाला कॅस्मेरोने रियल माद्रीदचा पाचवा आणि शेवटचा गोल नोंदवून ग्रेनेडाचे आव्हान संपुष्टात आणले.

Related posts: