|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » धुक्यामुळे गोवा एक्सप्रेसला 17 तास विलंब

धुक्यामुळे गोवा एक्सप्रेसला 17 तास विलंब 

प्रतिनिधी/ मिरज

उत्तर भारतात पडलेली कडाक्याची थंडी आणि दाट धुके यामुळे दिल्ली आणि हरियाणाहून येणाऱया रेल्वेगाडय़ा पाच ते 12 तास विलंबाने धावत आहेत. शनिवारी गोवा एक्सप्रेस तब्बल 17 तास उशीरा आली. यामुळे वर्षांच्या प्रारंभीच प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. गोवा एक्सप्रेससह चंदीगड-यशवंतपूर, निजामुद्दीन यशवंतपूर, निजामुद्दीन-कोल्हापूर सुपरफास्ट या गाडय़ा पाच तासाहून आधिक काळाच्या विलंबाने धावल्या.

   सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. तेथे दाट धुके पसरले आहे. दिवसाही धुक्याची चादर सर्वत्र पसरेली असते. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे मुश्लीक झाले आहे. रेल्वेगाडय़ांच्या दळणवळणावरही या धुक्यामुळे परिणाम झाला आहे. धुक्यात रेल्वेगाडय़ा वेगात नेता येत नाहीत. त्यामुळे ताशी दहा ते वीस या वेगाने या रेल्वे गाडय़ा धावत आहेत. त्याचा परिणाम म्हणून या गाडय़ांना पाच ते 10 तासांचा विलंब होत आहे.

  डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून या गाडय़ा विलंबाने धावत आहेत. या धुक्याचा सर्वांत जास्त परिणाम निजामुद्दीन-गोवा या एक्सप्रेस होताना दिसत आहे. ही गाडी 29 डिसेंबरपासून आठ जानेवारी पर्यंत सलग दहाव्या दिवशी पाच ते 12 तास विलंबाने धावत आहे. शनिवारी तर ती तब्बल 17 तास विलंबाने धावली. गेल्या तीन दिवसात गोवा एक्सप्रेस दहा ते 17 तास विलंबाने धावत आहे.

   गोवा एक्सप्रेसबरोबरच निजामुद्दीन-कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही शुक्रवारी आठ तास विलंबाने आली. निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्कक्रांती एक्सप्रेस शनिवारी सात जानेवारीला सहा तास उशीरा आली. तर, चंदीगड-यशवंतपूर ही गाडी रविवारी आठ जानेवारीला चार तास उशीराने आली.

   रेल्वेगाडय़ांना होणाऱया या विलंबामुळे वर्षाच्या प्रारंभीच प्रवाशांचे हाल होत आहेत. गाडी मध्येच एखाद्या स्टेशनवर तासन्तास थांबत असल्याने प्रवाशांचे खाण्यापिण्याची गैरसोय होत आहे. रात्रीच्यावेळी थंडीत त्यांना कुडकुडत गाडी सुरू होण्याची वाट पाहत बसावे लागत आहे. गाडी नेमकी कधी निघणार याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नसल्याने प्रवाशी हैराण झाले आहेत. उत्तर भारतातून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये जाणाऱया प्रवाशी गेली दहा दिवस रेल्वेगाडय़ांच्या या विलंबामुळे त्रासले आहेत.

Related posts: