|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » राज्याच्या वनक्षेत्राचा बोजा सिंधुदुर्गवर

राज्याच्या वनक्षेत्राचा बोजा सिंधुदुर्गवर 

वार्ताहर/ कणकवली

सिंधुदुर्ग जिह्याला 2004-05 पासून अनेक जमीन प्रश्नांनी व्यापले आहे. ओसरगाव येथील सुमारे 1800 एकर जमिनीवर खासगी ‘वने’ म्हणून नोंद करण्यात आल्याच्या मुद्यावर जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने उपययोजना करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात वन क्षेत्रासाठी राखीव ठेवायच्या जागेचा बोजा एकटय़ा सिंधुदुर्गावर टाकण्यात आला. त्यावेळी काहीजण स्वत:च्या गुर्मीत असल्याने हा गोंधळ निर्माण झाला. हा प्रश्न केवळ कागदोपत्री न सोडवता पुनर्विलोकनासाठी प्रयत्न करण्यात येतील. ओसरगावसाठी याप्रश्नी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी ओसरगाव ग्रामस्थांच्या बैठकीत दिली.

2005 मध्ये ओसरगाव येथील 578 हेक्टर (1800 एकर) जमिनीवर वनेची नोंद करण्यात आली. त्याबाबत ग्रामस्थांनी नुकतीच प्रांताधिकाऱयांची भेट घेत निवेदन दिले होते. याबाबत खासदार राऊत यांनी रविवारी सायंकाळी ओसरगाव विठ्ठल मंदिरात ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख सचिन सावंत, शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेटय़े, उपतालुकाप्रमुख राजू राणे, ऍड. विलास परब, गजानन तळेकर, माजी उपसरपंच बबली राणे, सदा मोरे उपस्थित होते.

यावेळी ऍड. परब यांनी ग्रामस्थांच्यावतीने पार्श्वभूमी मांडली. वने म्हणून 1253 नंबरने नोंद झाली असून या फेरफारचे पुनर्विलोकनाचे आदेश देऊन हे शेरे काढण्याची मागणी केली. तसेच आगामी जि. प., पं. स. निवडणुकीवेळी मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा  ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱयांना दिला होता याकडे लक्ष वेधले. 1253 च्या आदेशाचे पुनर्विलोकन व्हावे, यासाठी तहसीलदारांकडे करण्यात आलेल्या अर्जानुसार त्यांनी उपविभागीय अधिकाऱयांकडे परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, त्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही. 2005 पासून असलेल्या या बेकायदेशीर नोंदीमुळे आमचे नुकसान झालेले असून मानसिक त्रासही झालेला आहे. तसेच 1253 ची नोंद रद्द करून या जाचक नोंदीपासून मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी ऍड. परब यांनी ग्रामस्थांच्यावतीने केली.

खासदार राऊत यांनी जिह्यात कबुलायतदार – गावकर, आकारीपड, देवस्थान, सिडको जमीनीचे प्रश्न निर्माण झाले. हे प्रश्न टप्याटप्याने सोडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. वागदेचा 45 मीटरचा विषय मार्गी लावण्यात आला आहे. त्यानुसार ओसरगावचा हा प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे राऊत यांनी सांगितले.

वैभव नाईक म्हणाले, कसाल बाजारपेठ, हिर्लोकसारख्या भागातही वने म्हणून सातबारावर नोंदी करण्यात आल्या. मात्र हा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात दाखल असून विधानसभेतही मी आवाज उठविला होता. ओसरगाव ग्रामस्थांच्या एकजुटीखाली हा प्रश्न शासन दरबारी मार्गी लावण्यात येईल.

Related posts: