|Sunday, October 13, 2019
You are here: Home » Top News » दाट धुक्यामुळे मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक मंदावली

दाट धुक्यामुळे मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक मंदावली 

ऑनलाईन टीम /मुंबई  : 

सलग दुसऱया दिवशी दाट मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक मंदावली आहे. किवळे परिसरात दाट धुके निर्माण झाले आहे. कमी दृश्यमानतेमुळे वाहनांचा वेग मंदावला असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

दाट धुक्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुटीनंतर पुण्याहून मुंबईकडे व मुंबईहून पुण्याकडे परतणाऱया प्रवाशांना याचा फटका बसला आहे. रविवारी या मार्गावर दाट धूके होते. परंतु सोमवारी रविवारपेक्षाही धुक्याचे प्रमाण अधिक आहे. कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणुन वाहनचालकांनी काळजी घेण्याचे अवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.