|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » शिवस्मारक समितीवरून विनायक मेंटेना हटवा ; मराठा संघटनेची मागणी

शिवस्मारक समितीवरून विनायक मेंटेना हटवा ; मराठा संघटनेची मागणी 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

मराठा समाजाच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या बैठकीत मराठा समाजाच्या संघटनांनी शिवस्मारक समितीची पुनर्गठन करण्याची मागणी केली असून शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायाक मेटे यांना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

मेटेंवर आक्षेप घेतला असून त्यांनी काम केले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. मराठा संघटनांना यात सामील करून घेतल नसल्याचे सांगतानाच मेटेंची कार्यपध्दत मान्य नसल्याचेही आरेपही यावेळी करण्यात आला आहे.एकुण 43 मराठा समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजेरी लावली होती . छावा संघटना, मराठा आरक्षण समन्वय समिती, ताराराणी ब्रिगेड प्रदेश, शंभूराजे युवा क्रांती संघटना, शेतकरी मराठा सेवा संघटनांचा समावेश होता.