|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » कुंभ

कुंभ 

आकाशगंगेतील  लाभस्थानावर मालकी हक्क असणारी ही रास आहे. मनुष्य प्राण्याला जीवनात कोणत्याही मार्गाने जे काही लाभ होतील ते दर्शविणारे हे स्थान आहे. त्यामुळे या राशीला अतिशय महत्त्व आहे. दिसायला स्मार्ट, बळकट प्रकृती हा यांचा ट्रेडमार्क. घर नेहमी भरलेले असावं त्यासाठी पाण्याने भरलेला कुंभ याचे चिन्ह. या राशीच्या लोकांनी वाईट भविष्य सांगितलं तर ते खरे होते. न्यूटनच्या तिसऱया नियमानुसार ते भविष्य अनेक पटीने यांच्यावर बुमरँगप्रमाणे उलटते. त्यामुळे कोणालाही वाईट दोष सांगू नका. जे सांगाल ते तुमच्यावरच उलटेल. एकाच वेळी पाच नोकऱया व उद्योग करण्याची क्षमता, कुबेराचे ऐश्वर्य प्राप्त करण्याचे कसब हे लोक दाखवू शकतात.

यावषी 10 फेब्रुवारीचे चंद्रग्रहण ष÷स्थानी होत असून धनलाभाच्यादृष्टीने उत्तम परंतु आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या. अनिष्ट आहे. त्यामुळे खर्च वाढतील. निष्कारण कोणीतरी एखाद्या प्रकरणात अडकवतील. सावध रहा. यावषीच्या संक्रांतीने वर्षभर तुम्हाला वस्त्रप्रावरणांचा लाभ होत राहील. या वस्त्रांचा योग्य मान राखल्यास तुमची आर्थिक परिस्थिती निश्चित सुधारेल. 7 एप्रिलला हर्षल बदलत असून नवनवीन कल्पना सुचतील. त्यांचा व्यवहारात फायदा करून घ्याल. नवनव्या कल्पना शिकाल. भावंडांच्या बाबतीत आकस्मिक वाहन अपघात योग. या हर्षलमुळे जगाच्या कल्याणासाठी काहीतरी करून दाखवाल. हर्षलचा कालावधी साधारण 7 वर्षे असतो. त्यामुळे हे अनुभव आगामी 7 वर्षे येतील. गुरुचे भ्रमण वर्षाच्या उत्तरार्धात सर्वदृष्टीने भाग्यकारक आहे. शुभ कार्यासाठी प्रवास घडतील. महत्त्वाच्या वाटाघाटींना गती मिळेल. राशीस्वामी शनी लाभात असल्याने आगामी  कालखंडात मोठे लाभ होत राहतील. श्रीमंतीत व वैभवात रहाल. नावलौकिक होईल. नोकरचाकरांचे सौख्य लाभेल. शत्रूंच्या कारवाया थंड पडतील. संततीबाबतीत मात्र त्रास उद्भवतो.

अत्यंत हुशार, एकाचवेळी पाच कामे करण्याची क्षमता, अवघड कामे पूर्ण करण्याची हौस व जीवाला जीव देणारी ही रास आहे. मंगळ, शनि, राहू- गुरु या सर्व ग्रहांचे बळ असणारी ही रास. हाती घेतलेले काम पूर्ण करणे हा स्थायीभाव. यावर्षी गुरु अष्टमात आहे. येथील गुरु शुभ मानला जात नाही. पण कोणतेही मोठे संकट आले तरी त्यातून सुटका होईल. सोने धारण केल्यास या गुरुचा आशीर्वाद मिळेल. पिता व पुत्र एकमेकांपासून दूर जाण्याची शक्मयता. आर्थिक स्थिती मात्र उत्तम राहील. सर्व क्षेत्रात संघर्ष जाणवेल. वडिलोपार्जीत इस्टेटीच्या बाबतीत समस्या निर्माण होतील. शनि अथवा मंगळाच्या वस्तू खरेदी केल्यास ते विषवर्धक ठरेल. राशीस्वामी शनि जानेवारीपर्यंत दशमात राहील व त्यानंतर काही काळ लाभात राहील. सर्व दृष्टीने शुभ फल देणारा आहे. सर्व इच्छा पूर्ण होतील. घर बांधल्यास पैशाची आवक वाढेल. दुसऱयांचा आदर केल्यास मानसन्मान मिळवाल. जमीन खरेदीचे योग येतील. स्कुटर, कार घेण्याची हौस पूर्ण होईल. शेअर बाजार, सट्टा-जुगार यातून धनलाभाची शक्मयता. धार्मिक आचरण चांगले राहील. मुलाबाळांच्या बाबतीत विशेष लक्ष द्यावे लागेल. घराचे दार जर दक्षिणेला असेल तर अनिष्ट परिणाम जाणवतील. मद्यपान व मांसाहार यापासून दूर रहा. मित्र-मैत्रीणीपासून धोका, उधार-उसनवार व दिलेली रक्कम अडकेल. व्यापार उद्योगात म्हणावी तशी प्रगती राहणार नाही. राहू-केतूचे भ्रमण अनेक बाबतीत यश देणारे असले तरी ऐनवेळी नव-नवीन समस्या निर्माण करील. नवनव्या कल्पना सुचतील व त्याचा व्यवहारात चांगला उपयोग कराल. प्लुटोमुळे कायमस्वरुपी व लक्षात राहण्याजोगे परिणाम दिसून येतील. मित्र-मंडळीला वाहन देताना तसेच जामीन राहताना सावध रहावे लागेल. पैसा हाती आला तरी खर्चही तितकाच होईल. अपघात, आजार व राजकीय संकटे यापासून सावध रहा. तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या व्यक्ती या राशीवर जन्माला येतात. शनिची मालकी असलेल्या या राशीवर मंगळ, गुरु, राहू या ग्रहांचाही अधिकार आहे. या राशीतील काही विशिष्ट अंशावर, योगावर सुरू केलेले उद्योग व्यवसाय प्रचंड यश देतात. विमान-विद्या, कॉम्प्युटर्स, आकाशातील वीज, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्रचंड वेग यासह असंख्य बाबीवर या राशीचे गुणधर्म तपासता येतात. एखादे गुप्त प्रेमप्रकरण यांच्या आयुष्यात येण्याची शक्मयता असते पण बाहेरून मात्र हे अत्यंत स्थितप्रज्ञ दिसून येतात. कुंभ राशीच्या व्यक्ती म्हणजे जगाच्या कल्याणासाठी निसर्गाने निर्माण केलेली कलाकृती आहे. या राशीच्या हातून संशोधन मार्गाने व नवनव्या शोधाने जगाचे जितके कल्याण झाले असेल त्याला तोड नाही. मोठ-मोठे कारखाने आधुनिक सुखसोयी सर्व तऱहेचे लोखंडी व्यवसाय, आटोमोबाईल क्षेत्र, टेलीफोन यासह जीवनाच्या सर्व भागावर या राशीचे प्राबल्य असते. अमाप संपत्ती हे लोक बाळगून असतात पण वरून ते काहीही दाखवित नाहीत. कुंभ राशीच्या व्यक्ती जेथे जेथे काम करतात त्या त्या ठिकाणी आपल्या चातुर्याचा ठसा उमटवितात. एखादे अवघड काम कमी मनुष्यबळात कसे करता येईल यावर हे लोक विचार करीत असतात. म्हणून या राशीच्या लोकांना परदेशात लेबर किलर म्हणून संबोधतात. एकाच वेळी पाच नोकऱया व उद्योग करण्याची क्षमता, कुबेराचे ऐश्वर्य प्राप्त करण्याचे कसब हे लोक दाखवू शकतात. काही राशीत मृत्युष्टक योग होत असलेल्या या लोकांनी सावधगिरी बाळगणे योग्य ठरते मंगळाचे धाडस, धडाडी, फळांचा राजा आंबा, गुरुची सात्विकता व प्रगल्भ बुद्धिमत्ता, भूतबाधा, संमंधबाधा, पूर्वजन्माशिवाय बरेच बाधिकदोष याच राशीत येतात. शनिची ही रास आहे. शनि हा न्यायाधीश आहे. त्याला वावगे खपत नाही. कोणतेही व्यसन अनैतिक धनार्जन व इतर मार्गाने जीवन व्यथित करण्याचा या लोकांनी प्रयत्न केल्यास पुढे ते त्यांना अतिशय त्रासदायक ठरु शकते.


मासवार फलप्राप्ती

जानेवारी  – विरुद्धलिंगी व्यक्तिकडे आकर्षित होण्याचे योग. त्यामुळे कुटुंबातील वातावरण तणावग्रस्त राहील. कोणाच्याही भुलाव्यात अडकू नका. वर्षभर संक्रातीच्या कृपेने वस्त्रप्रावरणे व दागिन्यांचा लाभ होत राहील. हर्षल मंगळ धनस्थानी असल्याने ध्यानीमनी नसताना मोठे खर्च उद्भवतील. कोठेही गुंतवणूक करू नका. सावधानता बाळगा. भावंडात एकवाक्मयता राहणार नाही. विवाहसंदर्भात कोणतीही बोलणी या महिन्यात करू नका.


 

फेब्रुवारी – रवि -बुधाची युती तुमच्या राशीत होत आहे. नोकरीसाठी प्रयत्न करा यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. उच्च अधिकारी वर्गाशी संबंध येतील. कुटुंबातील काही परंपरा बदलण्याचा प्रयत्न करा. या महिन्यात व्यसन सोडण्याचा प्रयत्न केल्यास यशस्वी व्हाल. तीर्थक्षेत्री अथवा धार्मिक स्थळी काही तरी सुधारण्याचा प्रयत्न कराल. दूरवरच्या प्रवासाचे योग येतील. महाशिवरात्री तुमच्या राशीतच होत आहे. दैवी कृपा लाभून देणारा योग. नोकरीत बढती मिळण्याची शक्मयता.


 

मार्च- बलवान मंगळ तृतीयेत आहे. वास्तूच्यादृष्टीने उत्तम योग. किंमती वाहन खरेदी करण्याची शक्मयता. 28 पुढे वय असेल तर विवाह होण्याची शक्मयता. बुध निर्बल आहे. कोठेही सही करताना जपा. बँक बॅलन्सबाबत कोणासमोर बोलू नका. शुक्र धनस्थानी असल्याने हरवलेले अथवा चोरीस गेलेले साहित्य मिळेल. मन लावून काम करण्याच्या वृत्तीमुळे लोकप्रियता लाभेल. आर्थिक समृद्धी येईल. कलाकौशल्यात प्राविण्य मिळवाल.


 

एप्रिल – तृतीयेत मंगळ, बुधाची युती कागदोपत्री व्यवहारात यश मिळवून देईल. मेडिकल लाईन, अकौन्टसी व आयकर, विक्रीकर यांच्याशी संबंध असेल तर यश मिळेल. घराण्याची प्रगती होण्यासाठी नवीन योजना आखाव्या लागतील. त्यात भावंडे व नातेवाईकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कोणाच्याही कर्ज प्रकरणात मध्यस्थी करू नका. नको त्या ठिकाणी महत्त्वाच्या गेष्टी बोलणे टाळा. अन्यथा त्याचा गैरवापर होईल. 


 

मे – एखाद्या कार्याबद्दल शासकीय मानसन्मान होण्याची शक्मयता, उद्योग   व्यवसायात प्रगती होईल. मित्र-मैत्रीणी व थोरांचे सहकार्य लाभेल. जल पर्यटनांचे योग. चारचाकी वाहन घेण्याची इच्छा होईल. ट्रान्सपोर्ट व प्रॉपर्टी  डिलरच्या कार्यात चांगले यश. त्याच बरोबर आई व बहिणीच्या संदर्भात अनिष्ट योग. अग्निभय तसेच वीजतारा यापासून धोका. आर्थिक स्थितीवर परिणाम करणारे ग्रहमान. विवाहात अडथळे येतील, पण तडजोडीने गेल्यास यश मिळवाल. अनोळखी पाहुण्यांचे आगमन होईल.


 

जून- पंचमात आलेला मंगळ धांदरटपणा वाढविल. सावकारी व्यवसाय, बँक, कारकूनी, दूरसंचार यात उत्तम यश. कठीण परिस्थिती आली तरी त्यातून मार्ग काढाल. उत्तरार्धात रविही तिथेच येत असल्याने शिक्षण व क्रीडाक्षेत्रात नावलौकीक होईल. नवीन उद्योग करावासा वाटेल. स्वत:च्या चुकीने आर्थिक विवंचना वाढवून घ्याल. 18 तारखेस बुध त्रिकोणात येईल. संसारिक जीवन सुखी व आनंदी राहील. प्रेमविवाहाची शक्मयता.


 

जुलै- कर्तबगारी वाढेल. पूर्वीच्या काही चुका निस्तरण्याचा प्रयत्न कराल. मधूमेह, रक्तदाब, मूळव्याध व दुर्घटना यापासून जपा. तुमचे एखादे संशोधन मोठी प्रसिद्धी मिळवून देईल. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश. कोर्ट प्रकरणाचा निकाल तुमच्यासारखा अनुकूल लागेल. प्रामाणिकपणाने केलेले काही व्यवहार मोठे धनलाभ देऊन जातील. घाईगडबडीत पर्स, कागदपत्रे, कपडय़ांची बॅग, फोटो फिल्म वा लॅपटॉप विसरण्याची शक्मयता आहे. काळजी घ्या.


 

ऑगस्ट-अडलेली कामे पटापट होऊ लागतील. महापौर, आमदार, खासदार मंत्री वगैरे होण्याचा योग होईल. शैक्षणिक क्षेत्रात असाल तर नवीन काहीतरी करून दाखवाल. पति-पत्नीत उत्तम सहकार्य व सामंजस्य राहील. 21 तारखेस षष्ठात येणारा शुक्र निवडणुकीत यश मिळवून देईल. एखाद्या नाकारलेल्या व्यक्तिशी विवाह संबंध जुळण्याचे योग. कोर्ट प्रकरणात सावधानता बाळगा. आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. बहीण, आत्या व कन्या यांच्या बाबतीत जपावे लागेल. कोणत्याही अनोळखी क्यक्तीच्या गोड बोलण्याला भुलू नका अन्यथा कोठेतरी अडकाल.

 

सप्टेंबर – काही वेळेला ठरवून केलेली कामे होत नाहीत. पण अवघड कामे मात्र त्वरित होतात. याचा अनुभव येईल. 12 तारखेला गुरु भाग्यात येत आहे. काही अडचणी कमी होतील. मंगलकार्याच्या वाटाघाटी घरात सुरु होतील. कष्टाला न्याय मिळेल. आर्थिक संपन्नता होईल. धार्मिक आचरण ठेवा त्यामुळे नशिबाची साथ मिळेल. वैभव शिखरावर पोहोचेल. मुलाबाळांचा भाग्योदय व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल.

 

ऑक्टोबर  – तीर्थयात्रेचे योग, वडिलोपार्जित धनसंपत्ती मिळेल. पूर्वी जर घराण्यात एखाद्याचा जीव वाचवला असेल तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. आरोग्य सुधारेल. कर्जफेड करू शकाल. शत्रू आपोआप दूर जातील. कोणी निष्कारण बदनामी करत असेल तर त्यातून सुटका होईल. साधुसंत अथवा सज्जन व्यक्ति घरी आल्यास त्यांचा आशीर्वाद  घ्या. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचारांना चुकूनही थारा देऊ नका. जर कोणी तुम्हाला जुन्या अथवा वापरलेल्या वस्तू दिल्यास त्या शक्मयतो घेऊ नका. अन्यथा त्यांचे दोष तुमच्या मागे लागतील.

 

नोव्हेंबर-ग्रहमान अनेक बाबतीत बेहद्द खुश आहे. अनेक महत्त्वाचे संकल्प सिद्ध होतील. आर्थिकदृष्टय़ा उत्तम योग आहे. वाहन घेण्याचा योग येईल. लोकप्रियता लाभेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य. कष्टाळू व सरळमार्गी असाल तर फार मोठे यश लाभेल. क्यसन असेल तर सुटेल. रवी, शुक्र दशमात वडिलोपार्जित इस्टेटीसाठी उत्तम. परदेश प्रवासाच्या संधी येतील. सामाजिक क्षेत्रात नेतृत्व गाजविण्याचा योग. एखादा कारखाना सुरू करण्याचा विचार कराल. विवाह जुळण्याचा योग. अपेक्षेपेक्षा चांगले स्थळ मिळेल. किमती वस्तू खरेदी कराल. काही शापित योगांचा काल सुरू आहे. त्यामुळे वादावादीचे प्रसंग, क्षुल्लक बाबींवरून मानसिक संभ्रम निर्माण होऊ देऊ नका.

 

डिसेंबर-या महिन्यात 15 तारखेपर्यंत महत्त्वाची मोठी कामे करा. दत्तजयंती सुखस्थानी होत आहे. कुटुंबातील दोष कमी होण्यास त्याची मदत होईल. भाग्यात आलेला मंगळ किरकोळ कारणावरून वादावादीचे प्रसंग निर्माण करेल. 15 नंतर रवी, शनिचा योग धाडसाने मोठय़ा कामात यश देईल. परंतु काही कारणामुळे जिवलग मित्र दुरावतील. मुलाबाळांच्या चुकांमुळे आर्थिक भुर्दंड पडेल. कोणाच्याही सरकारी प्रकरणात मध्यस्थी करू नका. तसेच मालक व वरि÷ अधिकारी यांच्याशी जपून बोला. बुध, शुक्र नोकरी व व्यवसायात मोठे लाभ घडवतील. परंतु कागदपत्रे व दस्तावेजांबाबत जपून रहा. चुकून ‘ध’ चा ‘मा’ होण्याची शक्मयता आहे.