|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कणकवलीत काँग्रेसकडून घंटानाद

कणकवलीत काँग्रेसकडून घंटानाद 

कणकवलीनोटबंदी, वाढती महागाई व भाजप सरकारच्या अन्य अन्यायकारी निर्णयाविरोधात व जिल्हय़ाचा ठप्प झालेला विकास याबाबत मोदी सरकारवर टीका करीत काँग्रेसतर्फे तालुक्यात ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन छेडण्यात आले.  मोदींनी नोटबंदीच्या स्वतःच्या हट्टापायी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले. गृहिणींना घर चालविणे मुश्कील झाले आहे. केवळ पोकळ घोषणा करून मोदींनी जनतेला भावनिक साद घालण्याचे काम केले असल्याची टीका करीत मोदी सरकारचा कणकवली काँग्रेसतर्फे सुरेश सावंत यांनी निषेध व्यक्त केला. येथील नरडवे नाक्यावर सुरू असलेल्या आंदोलनाला भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

नोटाबंदी, वाढती महागाई आदी विषयांबाबत कणकवली तालुका काँग्रेसतर्फे तालुक्यात ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात सर्वसामान्य जनतेला होणाऱया त्रासाची व्यथा मांडण्यात आली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सुरू असलेला चलनकल्लोळ अद्याप संपलेला नाही. सर्वसामान्य जनतेला चलन उपलब्ध करून देण्यात राष्ट्रीय बँकांची क्षमता राहिलेली नाही. महागाईने जनता त्रासली असून सत्ताधारी केवळ घोषणा करीत आहेत. जिल्हय़ाचा विकास ठप्प झाला असून या सर्वांच्या विरोधात हे आंदोलन छेडण्यात आले.

येथील नरडवे चौकात या आंदोलनाला सोमवारी सकाळी सुरुवात करण्यात आली. हे आंदोलन सुरू असताना तेथून जात असलेल्या भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी तेली यांनी आंदोलनकर्त्यांची काही क्षण भेट घेतल्याने याबाबत शहरात चर्चा सुरू होती. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादीचे अबिद नाईक आदींनी आंदोलनाला भेट दिली. घंटा व जेवणाची ताटे वाजवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या निर्णयांचा निषेध केला.

मेघा गांगण यांनी आंदोलनप्रसंगी जनसामान्यांना भेडसावणाऱया समस्या मांडत मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी शहराध्यक्ष समीर नलावडे, काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. कलमठ येथील आंदोलनात उपसभापती महेश गुरव, संदीप मेस्त्राr, निसार शेख, मिलिंद मेस्त्राr आदी सहभागी झाले होते.

तालुक्यात खारेपाटण बाजारपेठ, तळेरे बाजारपेठ, नांदगाव तिठा, फोंडाघाट बाजारपेठ, हुमरठ तिठा, कणकवली पटवर्धन चौक, कलमठ बाजारपेठ, वागदे,  हरकुळ खुर्द मंदिरात ही आंदोलने टप्प्याटप्प्याने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Related posts: