|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ठाण्यात 760 किलो अमलीपदार्थ जप्त

ठाण्यात 760 किलो अमलीपदार्थ जप्त 

चार जण अटकेत; अंबरनाथमधील सेंटॉरही फार्मावर छापा

ठाणे / प्रतिनिधी

अप्रोझोलम हा अमलीपदार्थ विकण्यासाठी आलेल्या लवकुश पप्पू गुप्ता (26) आणि अमित भीमराव गोडबोले (32) यांना ठाणे अमलीपदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून शुक्रवारी ठाण्यातील आनंद दिघे टॉवर येथून ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने सेंटॉर फार्मा प्रा. लि., अंबरनाथ येथे छापा मारून कंपनीत काम करणाऱया बसवराज हणमंत भंडारी (27) आणि अनिल कांता राजभर (25) यांच्यासह कंपनीतील अप्रोझोलम हा अमलीपदार्थ आणि अन्य केमिकल्स असा 760 किलोचा 19 कोटींचा माल जप्त केल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली.

अंबरनाथ येथील सेंटॉर फार्मा कंपनीत अटक आरोपी भंडारी आणि राजभर हे दोघेजण काम करीत होते. या दोघांनी कंपनीतील अप्रोझोलम हा अमलीपदार्थ दिल्याचे 6 जानेवारीला अटक केलेल्या गुप्ता आणि गोडबोले यांच्या तपासात निष्पन्न झाले. अमलीपदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके आणि पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझाडे यांनी अंबरनाथमधील कंपनीची तपासणी केली. सोबत अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारीही होते. कंपनीत 47 किलो अप्रोझोलम आणि इतर 12 प्रकारचे केमिकल्स पदार्थ पोलिसांना आढळले. दरम्यान कंपनीत 5 टनाचा साठा आढळला. तर 4 टन उत्पादित माल आढळला. पोलिसांनी 760 किलो अप्रोझोलम आणि इतर पदार्थ जप्त करून तपासणी करण्यात येत आहे. याची किंमत 19 कोटी रुपये असल्याची माहिती परमवीर सिंग यांनी दिली. या आरोपींनी अप्रोझोलम आणखी कुणाला विकले याचा तपास  पोलीस करीत आहेत. तर या धंद्यात कंपनीतील अन्य अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग आहे काय, याचा शोधही घेण्यात येत आहे.

प्रतिक्रीया

नार्कोटिक्समध्ये मोडणारे 27 प्रकारचे सायपॅट्रॉपीक ड्रग्ज आहेत. तर सेंटॉर फार्मा कंपनीत अशा 55 प्रकारचे उत्पादन करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभाग आणि अमली विरोधी पथक करीत आहे.

परमवीर सिंग, पोलीस आयुक्त, ठाणे

काय आहे अप्रोझोलम पदार्थ

अप्रोझोलम हे रसायन असून ते इतर वापरासोबतच नशेसाठी ड्रग्ज म्हणून वापरण्यात येते. या अमलीपदार्थाचा वापर प्रामुख्याने वेदनाशामक औषधे बनविण्यासाठी करण्यात येतो. नशा करणाऱयाची अप्रोझोलमला मोठी मागणी आहे.  या अमलीपदार्थाची किंमत प्रति किलो अडीच लाख रुपये असून याच्या सेवनाने झोप आणि थेट मेंदूवर परिणाम होतो.

Related posts: