|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मोदींच्य छायाचित्रांचे फलक काढा

मोदींच्य छायाचित्रांचे फलक काढा 

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

राज्य निवडणूक आयुक्तांना दिले निवेदन

मुंबई / प्रतिनिधी

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झालेल्या भागाच्या पेट्रोलपंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक काढण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती आणि कोकण या पाच विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेमुळे प्रशासनाने विविध राजकीय पक्षांचे फलक काढले आहेत. आचारसंहितेमुळे फलक काढण्यास कुणाचाही विरोध नाही. या नियमानुसार, विविध पेट्रोलपंपावर नरेंद्र मोदी यांची छबी असलेले फलक काढावेत, अशी मागणी सावंत यांनी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांना भेटून केली.

प्रशासनाने विरोधी पक्षाच्या नेत्यांचे सर्व फलक काढले आहेत. परंतु, सत्ताधारी भाजप आणि मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक आजही पेट्रोल पंपांवर झळकत आहेत, याकडे सावंत यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले. महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची प्रसिद्धी करणारे फलक बस स्थानके, रेल्वे स्थानके, एसटी बसेस  तसेच महापालिका परिवहन सेवेच्या बसेसवर लावण्यात आली आहेत. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर हे फलक काढणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळे आता तरी आचारसंहिता लागू असलेल्या सर्व ठिकाणच्या सरकारी जाहिराती काढण्याचे स्थानिक प्रशासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी सावंत यांनी केली.

Related posts: