|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शेततळ्यातील 26 सापांना मिळाले जीवदान

शेततळ्यातील 26 सापांना मिळाले जीवदान 

प्रवीण कांबळे/ लांजा

लांजा शहराजवळच्या वैभव वसाहत परिसरातील एका शेततळ्यामध्ये एक दोऩ . . नव्हे तर तब्बल 26 साप आढळून आल़े निसर्ग संवर्धन संस्था या प्राणीमित्र संस्थेच्या सर्प मित्रांनी या सापांना सुरक्षित अधिवासात सोडून जिवनदान दिले आह़े

साप म्हटला की साऱयांचीच घाबरगुंडी उडत़े मात्र सर्पमित्रांनी एकाचवेळी शेत तळयात असणाऱया 26 सापांना पकडून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडून दिले आह़े लांजा शहरानजीक असणाऱया वैभव वसाहत येथे प्रगत शेतकरी संजय बावधनकर यांचे लांजा-कोर्ले मार्गालगत शेततळे आह़े याच शेततळ्यात संजय बावधनकर यांना तळ्यामध्ये अनेक साप वास्तव्य करुन असल्याचे निदर्शनास आले होत़े शेताला पाणी देताना बावधनकर यांना सापांचा त्रास सहन करावा लागत होता . काहीवेळेला साप पाणी बाहेर काढताना बाहेर येत असत. अखेर बावधनकर यांनी शहरातील निसर्ग संवर्धन संस्थेच्या सर्प मित्रांना याबाबत माहिती दिली. सर्पमित्र समीर जाधव, ऋषीकेश केलते, सचिन जाधव, ओमकार नाईक, मंगेश लांजेकर, प्रशांत पांचाळ, सुजीत कांबळे, हरिश चव्हाण या सर्प मित्रांनी बावधनकर यांच्या खोल शेत तळ्यामध्ये उतरुन तब्बल 26 सापांना पकडले . सापांना पकडताना बघ्यांची गर्दीही मोठय़ा प्रमाणात होती.

पकडण्यात आलेले साप बिन विषारी दिवड जातीचे होत़े हे साप कोकणात मोठय़ाप्रमाणात आढळतात़ वेगवेगळ्या भागात पांडी बोकड, धोंडय़ा, हेवाळो, वयळ, धोंडय़ाल, पाणबुडय़ा, इरोळ, विरोळा अशा विविध नावाने हा साप ओळखला जातो.. हा साप बिनविषारी असला तरी त्याचा दंश दाहक असल्याचे सर्पमित्रांनी सांगितल़े ‘निसर्ग संवर्धन’च्या सर्पमित्रांनी पकडलेल्या या सापांना सुरक्षित अधिवासात सोडण्यात आल़े एकाचवेळी 26 सापांना जिवनदान देणाऱया निसर्ग संवर्धनच्या सर्पमित्रांचे कौतुक करण्यात येत आह़े

 

Related posts: