|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा, महाराष्ट्र एकांकिका स्पर्धेत इस्लामपूरचे ‘दो बजनिये’ प्रथम

गोवा, महाराष्ट्र एकांकिका स्पर्धेत इस्लामपूरचे ‘दो बजनिये’ प्रथम 

प्रतिनिधी/ वाळपई

मासोर्डे सत्तरी शांतादुर्गा कलामंच आयोजित गोवा, महाराष्ट्र पातळीवर मराठी, कोकणी स्पर्धेत महाराष्ट्रातील राजाराम इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी इस्लामपूर येथील मराठी एकांकिका ‘दो बजनिये’ यास प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. 

द्वितीय पारितोषिक छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय सातारा यांच्या ‘पांढऱया घोडय़ावरचा राजपुत्र’ यांना तर सत्कर्ष मुंबई यांनी सादर केलेल्या ‘दि ऍक्झिक्युशनर’ यांना प्राप्त झाले.

विवेक थिएटर मुंबई यांच्या ‘लगोरी’ व सकस मुंबई यांच्या ‘सेपॅडहॅण्ड’ यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली. एकांकिका स्पर्धा तीन दिवस चालली होती. वैयक्तिक बक्षिसे पुढीलप्रमाणे :

दिग्दर्शन : प्रथम-वैभव चव्हाण, सौरव तडगे (दोन बजनिये), पार्श्वसंगीत : प्रथम-अक्षय डांगे, शुभम कर्णे (दोन बजनिये), प्रकाशयोजना : अभिजीत जाधव (दि एक्झिक्युटर), उत्कृष्ट अभिनय स्त्री : गायत्री पवार (पांढऱया घोडय़ावरचा राजपुत्र), उत्कृष्ट अभिनय पुरुष : आकाश सावंत (दि एक्झिक्युटर), उत्कृष्ट अभिनय स्त्री : प्रशस्तीपत्रक- देवयानी मोरे, चैतन्या पाटील, उत्कृष्ट अभिनय पुरुष : प्रशस्तीपत्रक-वैभव चव्हाण, विक्रम पाटील, सुनील मुळेकर, ओंकार भोसले.

स्पर्धेचे उद्घाटन केरी अर्बन सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पिसुर्लेकर यांच्याहस्ते समई प्रज्वलित करून करण्यात आले. गोव्यात अशाप्रकारच्या आयोजनातून ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहन मिळते. सरकारने अशा उपक्रमांना पाठबळ देण्याची गरज यावेळी श्री. पिसुर्लेकर यांनी प्रतिपादली.

डॉ. रघुनाथ धुरी म्हणाले की, समाजात जीवंतपणा निर्माण करायचा असेल तर असे उपक्रम आयोजित केले पाहिजेत. यावेळी व्यासपीठावर देवस्थानचे अध्यक्ष सूर्यकांत गांवस, संस्था अध्यक्ष चंदन गांवस, माजी अध्यक्ष कृष्णा गांवस, खजिनदार समीर गांवस, स्पर्धेचे प्रमुख रमेश गावस आदी उपस्थित होते.

चंदन गावस यांनी प्रास्ताविक केले. संजीव गांवस यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा गांवस यांनी आभार मानले.

बक्षिसवितरण समारंभाला संस्थेचे अध्यक्ष चंदन गांवस, देवस्थानचे अध्यक्ष सूर्यकांत गांवस, संस्था पदाधिकारी परिक्षक अभय जोग, नितीन कोलवेकर, श्रीनिवास उसगांवकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेत गोवा महाराष्ट्र राज्यातील सुमारे 14 संस्थांनी सहभाग घेतला.