|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » अर्जुन रामपाल, जॅकी श्रॉफ करणार यूपीत भाजपचा प्रचार

अर्जुन रामपाल, जॅकी श्रॉफ करणार यूपीत भाजपचा प्रचार 

ऑनलाईन टीम / लखनऊ :

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अभिनेता अर्जुन रामपाल आणि अभिनेते जॅकी श्रॉफ हे दोघे भाजपचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत हे दोघे अभिनेते प्रचार करताना दिसणार आहेत.

shroff

उत्तरप्रदेशमध्ये फेबुवारी महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठे यश संपादन करुन राज्यसभेत भाजपचे संख्याबळ वाढवण्याचे काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तरप्रदेशमध्ये प्रचारसभा घ्यायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत आता लवकरच हे दोन अभिनेते प्रचारात दिसणार आहेत.