|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘श्रेया’ ठरली ‘लिटील व्हाईस ऑफ रत्नागिरी’!

‘श्रेया’ ठरली ‘लिटील व्हाईस ऑफ रत्नागिरी’! 

 

प्रतिनिधी / रत्नागिरी

रत्नागिरीतील ग्लॅमरस स्पर्धा ठरलेल्या ‘लिटील व्हाईस ऑफ रत्नागिरी-सिझन 3’चा किताब स्पर्धेतील सर्वात छोटी स्पर्धक श्रेया भागवत हिने पटकावला. स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहाच्या भव्य रंगमंचावर नेत्रदीपक रोषणाई, उदयराज सावंत यांची अद्ययावत साऊंड, दर्जेदार वादक कलावंत आणि ‘लिटील व्हाईस’चे मन बहरून टाकणाऱया सुरांत ‘लिटील व्हाईस ऑफ रत्नागिरी’ ही गीतगायन स्पर्धा बहारदार रंगली. सेलिब्रेटी परिक्षक अजित परब यांनी या स्पर्धेचे कौतुक केले. तसेच त्यांच्या हस्ते ‘लिटील व्हाईस’च्या विजेत्यांना गौरविण्यात आले. ‘मँगो इव्हेंटस् ऍण्ड सेलिब्रेशन्स’, ‘दिल से क्रिएशन्स’ यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

देवरूखच्या श्रेया भागवत या चिमुकलीने सर्व गाण्यांत आपली चुणूक दाखवत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कुणाल साळवी, तृतीय-साक्षी उत्पात, तर उत्तेजनार्थ पारितोषिक तेजस साठे याला मिळाले. रत्नागिरीकरांच्या उदंड प्रतिसादात आणि ‘लिटील व्हाईस’ना होणाऱया प्रोत्साहन, कौतुकाच्या जल्लोषात ही स्पर्धा पार पडली. एकाहून एक सरस गीते सादर करत ‘लिटील व्हाईस’नी स्पर्धेतील उत्सुकता शिगेला नेली.

रत्नागिरी, दापोली, चिपळूण, लांजा येथील ऑडिशनमधून निवडण्यात आलेल्या तन्वी कुलकर्णी, साक्षी उत्पात, गंधाली भागवत, कुणाल साळवी, तेजस साठे, साक्षी जांभेकर, पौर्णिमा कीर, संस्कृती पाटील, मृण्मयी महाडिक, श्रेया भागवत, सिद्धी पेडणेकर आणि स्वरांगी बाकाळकर यांच्या अंतिम फेरी रंगली. या 12 ‘लिटील व्हाईस’मधून श्रेया भागवत, तेजस साठे, कुणाल साळवी, साक्षी उत्पात, स्वरांगी बाकाळकर आणि सिद्धी पेडणेकर ‘टॉप 6’ची निवड झाली. यांच्यामध्ये चुरस होऊन स्पर्धेतील विजेते ठरले. ‘लिटील व्हाईस’ना समर्थ साथसंगत सिंथेसायझरसाठी राजू किल्लेकर, अमेय किल्लेकर, तबलासाथ पांडुरंग बर्वे, ढोलक-ढोलकीसाथ मंगेश चव्हाण, ऑक्टोपॅडसाथ प्रवीण पवार, तर गिटारसाथ समीर कांबळे यांनी केली.

स्पर्धेचा शुभारंभ आमदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वाढदिवसाप्रित्यर्थ उद्योजक किरण सामंत यांचा सत्कार करण्यात आला. शुभारंभ, बक्षिस वितरणाप्रसंगी रंगमंचावर नगराध्यक्ष राहुल पंडित, पत्रकार हेमंत वणजू, पं.स. सदस्य मंगेश साळवी, नगरसेविका शिल्पा सुर्वे, नगरसेविका दया चवंडे, शहर संघटक बिपीन बंदरकर, दीपक पवार, लायन्सच्या अध्यक्षा क्षिप्रा कोवळे, श्रेया केळकर, ओंकार फडके आदी राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा ‘मँगो इव्हेंटस् ऍण्ड सेलिब्रेशन्स’चे अभिजित गोडबोले ही स्पर्धा आयोजित करतात. त्यांना बाबू म्हाप, दीपक पवार, नगरसेवक निमेश नायर, प्रसन्न पेठे, परेश सावंत, मुन्ना देसाई, संदिप मगदूम, प्रसाद सुर्वे, किरण घाणेकर, संदिप रहाटे, बाबा भिंगार्डे, उदयराज सावंत, अमरेश सावंत, गणेश धुरी, अभिजित नांदगावकर, किरण कामतेकर आणि ‘मँगो इव्हेंटस्’च्या सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभते. याचबरोबर ‘दिल से क्रिएशन्स’चे सिद्धेश बंदरकर, छायाचित्रकार परेश राजिवले, साई पिलणकर, सचिन शिंदे, निलेश कोळंबेकर, राहुल देसाई, अनिकेत, तेजस यांच्या सहकार्याने स्पर्धेला अधिक रंगत येते.

गायक अजित परबच्या गीतांनी रंगत

आघाडीचा गायक, संगीतकार, अ†िभनेता अजित परब यांनी यावेळी सादर केलेल्या सेलिब्रेटी परफॉर्मन्सने रसिकांची मने जिंकली. ‘बगळ्यांची माळ फुले, देखा ना हाय रे’ या सादर केलेल्या गीतांना रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. तर नगराध्यक्ष राहुल पंडित यांनीही ‘फना’ चित्रपटातील गीत सादर करून किरण सामंत यांना सुरमई शुभेच्छा दिल्या. यात खास आकर्षण ठरली ती सिद्धी केळकर! तिने विविध कार्टुन पॅरेक्टरच्या काढलेल्या हुबेहुब मिमिक्रीने रसिकांना थक्क केले.

Related posts: