|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आगीत गोदाम भस्मसात

आगीत गोदाम भस्मसात 

प्रतिनिधी/ बेळगाव

बुरुड गल्ली या गजबजलेल्या मध्यवर्ती बाजारपेठेत मंगळवारी रात्री आगीचा प्रकार घडला. इलेक्ट्रिक सामानाने भरलेल्या गोदामात अचानक आग लागून सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत 10 लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याची माहिती स्पष्ट होऊ शकलेली नाही.

बुरुड गल्लीत स्पार्क इलेक्ट्रिकल्स दुकानाच्या पाठीमागील गोदामात हा प्रकार घडला आहे. अचानक आगीचे लोळ उठू लागल्यामुळे परिसरात खळबळ माजली होती. या गोदामात प्रवेश करण्यास कोणताच मार्ग उपलब्ध न झाल्याने आग विझविण्याचे नागरिकांचे प्रयत्न अपुरे पडले होते. अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दलाच्या जवानांनी दोन बंब आणून आग विझविण्याचा कसोशीने प्रयत्न चालू केला होता.

7.45 वाजण्याच्या दरम्यान लागलेली आग रात्री 8.30 वाजता पूर्णपणे विझविण्यात आली. दरम्यान, आतमध्ये बॅटऱया व इतर ज्वालाग्राही वस्तु असल्यामुळे आग धुमसून ती पुन्हा लागू नये यासाठी आतील सर्व साहित्य बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी बुरुड गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या कार्यालयाची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला. दरम्यान, आसपासच्या नागरिकांनीही त्यांना सहकार्य केले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी स्पार्क इलेक्ट्रिकलचे मालक राजू चिकोर्डे यांच्या नावे आगीच्या घटनेची नोंद केली आहे. आग शॉर्टसर्किटने लागली असावी का? याचा शोध घेण्यात येत होता.

Related posts: