|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जाहीर प्रचाराची सांगता

जाहीर प्रचाराची सांगता 

प्रतिनिधी / बेळगाव

एपीएमसी निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता मंगळवारी झाली. निवडणुकीची सुरूवात झाल्यापासून उमेदवारांनी प्रचाराचा धडाका उडवून दिला होता. अनेक मतदार संघात  तिरंगी, चौरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत. मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असल्याने आता गुप्त प्रचार करण्यात येत आहे. म. ए. समितीचे उमेदवार निवडून यावेत, यासाठी म. ए. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार प्रचार मोहीम राबवित आहेत.

जाहीर प्रचार संपला असला तरी काही मतदार संघात उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अनेक मतदार संघात नवखे उमेदवार आहेत. त्यामुळे मतदारांनी शेतकऱयांचे हित साधणाऱया उमेदवाराला निवडून देणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त होत आहे. समितीचा बालेकिल्ला असणाऱया बेळगाव, पिरनवाडी, बेळगुंदी, उचगाव, काकती, येळ्ळूर व व्यापारी मतदार संघात म. ए. समितीच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा मिळत आहे.

 मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर

गुरुवार दि. 12 रोजी सकाळी 7 वा. मतदानाला सुरूवात होणार आहे. बेळगाव एपीएमसी मतदार संघातील 96273 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्यातील काकती मतदार संघात मतदारांची संख्या अधिक आहे. मंगळवारी जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देत आहेत. ज्या मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

गुरुवारी होणाऱया मतदानापूर्वी अधिकाऱयांना मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवारी सकाळी तहसीलदार कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदाना दिवशी कशाप्रकारे कार्य करावे यांची माहिती निवडणूक अधिकारी आफ्रिन बानु बळ्ळारी यांनी दिली. बुधवारी दुपारनंतर निवडणूक अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. मतदान करण्यासाठी येणाऱया मतदारांनी ओळखपत्र आणणे गरजेचे आहे. ओळखपत्र असल्याशिवाय मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळे मतदारांनी ओळखपत्र घेवून जाणे आवश्यक आहे. 

Related posts: