|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बुडाची बैठक 13 रोजी

बुडाची बैठक 13 रोजी 

प्रतिनिधी / बेळगाव

बुडाच्यावतीने कणबर्गी येथे निवासी वसाहत योजना राबविण्यात येत असून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मात्र, काही शेतकऱयांनी भू-संपादनास आक्षेप घेतला असल्याने प्रस्ताव रखडला आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची सूचना नगरविकास खात्याच्या मुख्य सचिवांनी केली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवार दि. 13 रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कणबर्गी येथे निवासी वसाहत योजना राबविण्यासाठी 165 एकर भू-संपादन करण्यात येणार आहे. यापैकी 42 एकर जमीन मालकांनी भू-संपादनास आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यामुळे भू-संपादनास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे योजना कशी राबवायची हा पेच बुडा प्रशासनासमोर निर्माण झाला होता. परिणामी योजनेचा आराखडा अंतिम मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला नसल्याने काम रखडले होते. हिवाळी अधिवेशनादरम्यान नगरविकास खात्याचे मुख्य सचिव पोन्नुराज यांनी बुडा कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला होता. त्यावेळी कणबर्गी योजनेची माहिती घेतली असता न्यायालयाच्या स्थगितीच्या मुद्दय़ावर चर्चा झाली होती.

 शुक्रवार दि. 13 रोजी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सीडीपीच्या सुधारणेबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

 

Related posts: