|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » एपीएमसीसाठी आज मतदान

एपीएमसीसाठी आज मतदान 

प्रतिनिधी/ बेळगाव

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बेळगाव एपीएमसीसह जिह्यातील 10 एपीएमसींकरिता गुरुवार दि. 12 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होणार आहे. बेळगाव व खानापूर एपीएमसींवर समितीचा भगवा फडकाविण्यासाठी मराठी भाषिक मतदार सज्ज झाले असून अनेक मतदार मतदान करून रेणुका देवीच्या दर्शनासाठी सौंदत्तीकडे रवाना होणार आहेत. सर्व मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार असून म. ए. समितीसह काँग्रेस व भाजपने आपला उमेदवार निवडून यावा, यासाठी जोरदार हालचाली चालविल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांनी आपापले मतदारसंघ पिंजून काढले आहेत. काकती, सांबरा, बसवणकुडची, बेळगाव, उचगाव, बेळगुंदी, पिरनवाडी, देसूर, हिरेबागेवाडी, येळ्ळूरसह व्यापारी मतदारसंघात गुरुवारी मतदान होणार आहे. बेळगाव, उचगाव, बेळगुंदी, पिरनवाडी, काकती, येळ्ळूर या मतदारसंघात म. ए. समितीच्या उमेदवारांचा झंझावाती प्रचार करण्यात आला आहे. सातत्याने एपीएमसीवर महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता राहिली आहे. काही मतदारसंघात काँग्रेसने जोरदार प्रचार केला आहे.

हुदली मतदार संघातील निवडणूक बिनविरोध झाली आहे. इतर मतदारसंघात चुरशीने मतदान होणार असून काही मतदारसंघात तिरंगी तर काही ठिकाणी अधिक उमेदवार असल्याने बहुरंगी लढती होणार आहेत. निवडणुकीदिवशीच यल्लम्मा देवीची यात्रा आल्याने काही उमेदवारांनी यात्रेला जाणाऱया मतदारांसाठी वाहनांचीही व्यवस्था केली आहे. बेळगाव एपीएमसीसाठी एकूण 96 हजारांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गुरुवारी अनेकांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

बुधवारी सरदार्स हायस्कूल येथे निवडणूक अधिकारी व कर्मचाऱयांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर दुपारी प्रत्येक मतदान केंद्रावर परिवहन महामंडळाच्या बसद्वारे कर्मचाऱयांना पाठविण्याची सोय करण्यात आली. सकाळपासूनच या ठिकाणी शिक्षक व अधिकारी तसेच पोलीस दाखल झाले होते. दुपारी 2 नंतर मतदान केंद्रांवर कर्मचाऱयांना पाठविण्यात आले. त्या ठिकाणी पोलींग एजंटचे ओळखपत्र देण्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे अनेकजण ओळखपत्रे घेण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी करून होते. मतदान केंद्रांवर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, निवडणूक शांततेने पार पडावी यासाठी पोलीस कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सौंदत्ती येथील रेणुकादेवी यात्रेसाठी मोठय़ा प्रमाणात भाविक रवाना झाले आहेत. निवडणूक व यात्रेचा मुख्य दिवस असा योगायोग आल्याने उमेदवारही देवीकडे साकडे घालून आपणच विजयी व्हावे, अशी मागणी करताना दिसून येत आहेत. जाहीर प्रचाराची सांगता मंगळवारी झाली असली तरी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत व बुधवारीदेखील उमेदवार गुप्त प्रचार करीत होते. एकंदरीतच सर्वच मतदार संघात मोठय़ा प्रमाणात चुरशीने मतदान होण्याची शक्मयता असून काही उमेदवारांनी मतदारांना वेगवेगळय़ा प्रकारची आमिषे दाखविल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे.

एकंदरीत गुरुवारचा दिवस सर्व उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरणार असून सकाळच्या सत्रात अधिक प्रमाणात मतदान होण्याची शक्मयता आहे. कारण अनेकजण मतदान करून सौंदत्ती यात्रेला जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनीही सकाळच्या सत्रात अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून म. ए. समितीच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला आहे. जाहीर प्रचाराऐवजी प्रत्येक शेतकऱयाकडे जाऊन मताची याचना केली आहे. यापूर्वीच्या एपीएमसी निवडणुकीमध्ये कमी प्रमाणात मतदान झाल्याची नोंद आहे. मात्र यावेळचा प्रचार पाहता मोठय़ा प्रमाणात मतदान होईल, असा विश्वास उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे.

Related posts: